महाराष्ट्र योग असोसिएशनच्या वतीने पंच परीक्षेचे आयोजन...

म्हसळा वार्ताहर

महाराष्ट्र योग असोसिएशन व पालघर जिल्हा योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १०-०६-२०१८ रोजी, द्वितीय राज्यस्तरीय योग पंच व तांत्रिक प्रशिक्षण कार्यशाळा व राज्यस्तरीय योग पंच परिक्षेचे आयोजन अमेय क्लासिक क्लब, यशवंत नगर, विरार (प), ता. वसई, जि. पालघर येथे करण्यात आले आहे.सदर प्रशिक्षण व पंच परिक्षा सकाळी ७ ते संध्याकाळी ५:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. यावेळी योग फेडरेशन आॅफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय योगासन स्पर्धा, आर्टिस्टीक योगा, आर्टिस्टीक पेअर योगा, रिदमिक योगा, फ्री फ्लो डान्स योगा तसेच SGFI अंतर्गत योगासन स्पर्धा, आर्टिस्टीक योगा, रिदमिक योगा संदर्भात अभ्यासक्रम, सर्व नियम व स्पर्धेचे परिक्षण यावर सविस्तर माहिती दिली जाईल.आजमितीस साठ उमेदवारांची नोंद झाली असून ईच्छूकांनी आपली नावे नोंदवण्याकरिता मुंबई विभागातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष / सचिव यांच्या शिफारसीसह ९९२२१३४४४४ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन महाराष्ट्र योग संघटनेचे उपाध्यक्ष महेश कुंभार व आयोजक तथा विभागीय सचिव रुचिता ठाकूर यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा