बोर्लीपंचतन : अभय पाटील
बोलपंचतन येथील गणपती विसर्जन घाट मागील काही वर्षे गटाराच्या पाण्याच्या विळख्यात अडकला आहे अस्वच्छ पाण्यामुळे गेली अनेक वर्षे येथील गणपती दिवेआगर समुद्रकिनारी विसर्जात केले जात आहेत . परंतू बोर्लीपचतन ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . श्रीवर्धन तालुक्यातील बोलपंचतन हे सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले तालुक्यातील मोठे गाव आहे गणे शोत्सवात बोर्लीपंचतनमध्ये हिंदू धर्मीय घरोघरी हजारो गणपतीची प्रतिष्ठापना करतात . ६ वर्षापूर्वी गणपतीचे विसर्जन बोलॅपंचतन येथील छोट्या नदी पात्रामध्ये बांधलेल्या विसर्जन घाटामध्ये परंपरागत होत होते परंतु विसर्जन घाट असलेल्या नदी पात्रात गटाराचे पाणी जात असल्याने पाणी दुगंधीयुक्त व अस्वच्छ झाल्याने लाडक्या दैवताला अस्वच्छ पाण्यामध्ये विसर्जात कसे करावे ? असा प्रश्न गणेशभक्तांना पडतो . यामुळे बोर्लीपंचतन येथील गणेशमुतींचे विसर्जन सध्या २ किमी दिवेआगर येथील समुद्रकिनारी करण्यात येते . यासाठी ग्रामस्थांना खिशाला चाट देत एखादी गाडी भाड्याने घेत तर काही मूर्ती डोक्यावर घेऊन समुद्रकिनारी विसर्जन करण्यासाठी यावे लागते . ग्रामपंचायतदेखील काही गाड्या ग्रामस्थांना उपलब्ध करून देते गतवर्षी गौरी गणपती विसर्जनावेळी मोठी दुर्घटना गणेशाच्या कृपेनेच टळली . समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश विसर्जन करण्यास गेलेले ६ भक्त थोडक्यात बचावले होते . जीवरक्षक व तेथील कोळी बांधवांनी सतर्कता दाखवित त्यांची सुखरूप सुटका केली होती . दुर्दैवाने अनर्थ घडला असता तर त्यास कोण जबाबदार राहणार होते ? असा प्रश्न तेव्हा उपस्थित केला जात होता . सदरची घटना घडल्यानंतर बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडून गणपती विसर्जन घाट पुढील वर्षी सुशोभित करण्यात येईल असे सरपंच गणेश पाटील यांनी पत्रकारांस सांगितले होते मे महिना सुरु असून पावसाळ्यापूर्वी नदी पात्र व गणप ती विसर्जन घाटामध्ये येत असलेले गटरातील सांडपाणी थांबवून , तसेच वाढलेली झाडी काढून विसर्जन घाटाची स्वच्छता करावी , तसेच नदी पात्राचे सुंदीकरण करावे , अशी ग्रामस्थांमधून आग्रही मागणी आहे
गटाराच्या पाण्याने विसर्जन घाट अस्वच्छ झाला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जुन्या विसर्जन घाटाच्या पूर्वेला नवीन विसर्जन घाट बांधण्यासाठी २ लाख ७५ हजारांची तरतूद केली असून काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर कामास लवकरच सुरुवात होइल व त्या प्रत्यक्ष गणेशोत्सवात नवीन विसर्जन घाटामध्ये गणेश विसर्जन होईल .
- गणेश पाटील सरपंच , बोर्लीपंचतन

Post a Comment