दिघी , आदगावच्या सुकटीला वाढती मागणी; सुक्या मासळीत महागाईचे काटे...


दिघी : वार्ताहर

खोल समुद्रातील मासेमारी बंदी तसेच मोठ्या माशांचे चढे भाव अशा दोन कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे आठवडा बाजारामध्ये सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे दर पावसाळ्यात खवय्यांना सुकी मच्छीचाच आधार असतो . 
एकेकाळी दिघी बंदरातील मासेमारी मध्ये ओली मच्छी म्हणून कोलिमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असे त्यासाठी दिवस रात्र कोळी बांधव मेहनत करुण ओली कोलिम समुद्रातून बंदर किनारी सुकवण्यासाठी अनेक ओटे तयार करुण एप्रिल , मे च्या कड़क पार्यात कोलिम सुकवून पुणे , मुंबई सारख्या ठिकाणी सुख्या मासळी बाजारात नेत असत . त्यामुळे दिघी ची सुकट या नावाने पंचकृषित प्रसिद्ध झाली . सद्यस्थितित दिघी बंदरात मासेमारी मध्ये सुकट कमी प्रमाणात मिळत असल्याचे दिसून येत आहे पावसाळ्यातील दीड महिने हा मासेमारी बंदीचा काळ असून या दिवसात मच्छीमार आपल्या बोटी समुद्रकिनारी शाकारून ठेवतात . त्यामुळे मच्छीबाजारात पापलेट , हलवा , कोलंबी , सुरमईए , मांदेली व मुशी हे मासे पहावयास मिळत नाहीत . त्यामुळे खाडीतील मच्छी व सुकी मच्छी यावर नागरिकांचा भर असतो . खाडीतील निवटे , खेकडे तिसर्या तर सुकी मच्छीमध्ये सोडे , खारे , सुके बोंबील , सुकट यांचा समावेश असतो . सोडे हे  १२०० रू . किलो दराने बिकले जात आहेत . सुकटिचा किलो १५० ते २०० रु . किलो आहे . खाडीतील खेकडे ते ३०० रू . डझन ( लहान ) तर मोठे खेकडे ४०० ते ६०० रू . दराने विकले जातात . सुकी मच्छीही निरनिराळ्या गावामध्ये भरणाच्या आठवड़ा बाजारात हमखास उपलब्ध असतात.

श्रीवर्धन तालुक्यात कोणत्याही गावात आठवडा बाजार भरत नसल्याने दिघी , बोर्लीपंचतन तसेच भरडखोल अशा किनारी गावात सुकी मच्छी विचारावी लागते . खाडीतील मासे मात्र भागातील मच्छीबाजारात बिकले जातात . मासेमारी बंदीचा काळ संपला की मोठया माशांची आवक सुरू होते . तोवर मात्र खवय्यांना खाडीतील मच्छी व सुक्या मच्छीवरच अवलंबून रहावे गेल्या वर्षांच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरांत सरासरी शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे . पापलेट , सुरमई बांऐगडा या माशांची आवक घटल्याने  या प्रकारातील सुकी मासळी बाजारात उपलब्धच नाही . या साऱ्यामुळे अस्सल खवय्यांना मात्र , मासळी खाण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे एप्रिल महिन्यात सर्वसाधारणपणे बोर्लीपंचतनच्या बाजारपेठेमध्ये सुक्या मासळीचे आगमन होते गेल्या वर्षी सुक्या मासळीची आवक चांगली झाल्याने बाजारात दर कमी होते . मात्र , यंदा मत्स्य दुष्काळासारखी परिस्थिती असल्याने सुक्या मासळीची आवक घटली आहे . त्यातच काही मोसमी हवामान बदलाचा फटका सुक्या मासळीला बसला आहे सुके बोंबील जवळा , सुकट , कोलंबी आदी मासी बाजारात उपलब्ध आहे , परंतु पापलेट , सुरमई , बांगडा या सांरखी मोठी सुकी मच्छी समुद्रातील ओल्या मच्छीच्या कम तरतेमुळे उपलब्ध होऊ शकली नाही , असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले 

सुसज्ज मार्केटची कमतरता...
विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्या मुळे श्रीवर्धन तालुक्याची आता पर्यटन क्षेत्र म्हणून खास ओळख बनली आहे मात्र , स्थानिक तसेच पर्यटकांना ओली किंवा सुकी मासळी मिळण्यास एकही खास ठिकाण नाही . त्यामुळे जीवना , भरडखोल , दिवेआगर , आदगाव तसेच दिघी येथील मच्छिमारांना मच्छि विकण्यास अडचण येतात . प्रशस्त मच्छिमार्केट ची गरज असल्याचे कोळी बांधव सांगतात . तसेच दिवेआगर , दिघी - जंजिरा तसेच हरिहरेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून सुक्या कोलीम ची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक देतात . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा