"आयुषमान" साठी म्हसळा तालुक्यात सर्वेक्षण..


प्रतिनिधी, म्हसळा

देशातील प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करणे , दीर्घकालीन उपचारांमुळे आर्थिक संकट कोसळलेल्या कुटुंबाना आर्थिक सुरक्षा पुरविणे या मुख्य उद्दिष्टाने आयुषमान भारत या योजनेचे संपूर्ण देशात सर्वेक्षण सुरू आहे अशाच पध्दतीने म्हसळा तालुक्यातील एक नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतींतील ४४८५ बीपीएल कुटुंबांचे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे . सदर सर्वेक्षण म्हसळा , मेंदडी व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेवरूळ , जांभूळ , तळवडे , मेंदडी , वारळ , खरसई खामगाव , बावे , आंबेत या उपकेंद्रातील माध्यमातून हे सर्वेक्षण होणार आहे . या विमा योजनांतर्गत ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना विलीन करण्यात आली आहे . देशातील १० कोटी कुटुंबाला याचा लाभ होणार आहे . द्वितीय व तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रु . ५ लाख विमा संरक्षण देण्यात येणार आहे , असे सूत्रांनी सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा