रायगडात खरिपाची पेरणी ८ , ८०० हेक्टर क्षेत्रात होणार भाताची लागवडम्हसळा : संजय खांबेटे

रोहिणी नक्षत्र लागले असून , हवामान खात्याने मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा आंदाज वर्तविला आहे या पाश्र्वभूमीवर शेतकर्यांनी शेतात पेरण्यांच्या कामांना हळूहळू सुरुवात केल्याचे दिसते . मान्सून अंदमानात पोहोचला असे हवामान खात्याने म्हटले आहे . त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच मोसमी पावसाचे राज्याच्या किनारपट्टीवर व कोकणात आगमन होईल , अशी चिन्हे आहेत . हवामान खाते अंदाज वर्तवित असले , तरी शेतकरी दुस-या बाजूने पंचांगांचा आधार घेत असतात , असे म्हसळ्यातील पंचाग अभ्यासक महेश जोशी यांनी सांगितले . पावसाच्या बाराही नक्षत्रांत बर्यापैकी पाऊस पडणार असल्याचे भाकीतही जोशी यांनी वर्तविले आहे . रोहिणी नक्षत्रात पावसाला सुरुवात होते . नक्षत्र व त्याचे वाहन यावरून शेतकरी पावसाचा अंदाज बांधून शेती व फळपिकाच्या मशागती व पुढील कामाची आखणी करतात . तेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे 

शेतकरी पंधरवडा...
जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कृषी विभागातर्फ २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येतोय त्याचा फायदा शेतकर्यांना होईल . 

रायगड जिल्ह्यात सुमारे १५९ ग्रामपंचायती अंतर्गत ५६२ गावे व वाड्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने सध्या पेरणीचे प्रमाण कमी दिसते . असे असले तरी २८ मेनंतर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पेरणीच्या कामात व्यस्त होईल .
- ईश्वर चौधरी , तालुका कृषी अधिकारी , म्हसळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा