फोटो संग्रहित
म्हसळा ( प्रतिनिधी )
श्रीसमर्थ ग्रामविकास मंडळ मोरवणे ( मुंबई ) या मंडळाचा १३ वा वर्धापन दिन गुरूवार दि . १० मे २०१८ ला साजरा होणार आहे. म्हसळा तालुक्यातील मोरवणे गावातिल तरुणानी २००५ साली गिरगाव चौपाटीवर श्रीसमर्थ ग्रामविकास मंडळाची स्थापना केली आणी त्या माध्यमातुन गावात कला , क्रीडा सास्कृतीक , असे विवीध कार्यक्रम राबवत असतात आज या माध्यमामुळे गावात होतकरू तरूण निर्माण झाले आज सर्वच तरूण गावाच्या विकासासाठी झटताना दिसतात गावात शांतता नादावी गावात एकात्मता टिकावी म्हणून सर्वांची ओढ पाहून आनंद वाटतो . दरवर्षी प्रमाणे याही वर्षा वर्धापना निमीत्त श्रीसत्यनारायणाची पुजा , महीलांसाठी हळदीकुंकू , लहान मुलांसाठी सास्कृतीक कार्यक्रम आणी तरुणांसाठी क्रीकेटच आयोजन केल आहे .

Post a Comment