आमदार झालो तरी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेन - अनिकेत तटकरे
म्हसळा : वार्ताहर
महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या विधान परिषद आमदारकीच्या सहा जागांपैकी कोकण विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनिल तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी ३ मे २०१८ रोजी आपला उमेदव री अर्ज दाखल केला आहे विधानसभेचे उमेद वार अनिकेत तटकरे यांनी रत्नगिरी , सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात प्रचाराची घोडदौड सुरू करून मतदारांच्या गाठीभेटी आणि राजकीय जेष्टमंडळीचे आशिर्वाद घेत आहेत . आपल्या हक्काचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या श्रीवर्धन म तदार संघात दि . ५ मे २०१८ रोजी अनिकेत तटकरे यांनी प्रथम श्रीवर्धन , म्हसळा , तळा , रोहा येथील मतदार असलेले पंचायत समितीचे सभापती , जिल्हा परिषद सदस्य , नगर पंचायत , नगर परिषदेचे सदस्यांची भेट घेतली आणि निवडणुकी बाबत प्रत्यक्ष चर्चा केली . यावेळी म्हसळा येथे संपन्न झालेल्या सभेत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपण आमदार झालो तरी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करीत राहणार असल्याचे विश्वास पूर्ण प्रतिपादन केले आहे म्हसळा तालुक्यात १९ नगरसेवक , पंचायत समिती सभापती आणि २ जिल्हा परिषद सदस्य आसुन एकुण २२ मतदान आहेत पैकी राष्ट्रवादी काँग्रेस १८ मतदार आहेत तर मित्र पक्ष कॉग्रेसचे ३ आणि एकमेव शिवसेनेचा मतदार आहे ही सर्वच मते अनिकेत तटकरे यांच्या पारड्यात पडतील आणि आघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा दणदणीत विजय होऊन आपल्याला हक्काचे आमदार भेटतील असा विश्वास पक्षाचे नेते अलिशेठ कौचाली , जेष्ठ कार्यकर्ते बालशेठ करडे , समीर बनकर , माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले . ही निवडणुक चुरशीची होईल अशी अपेक्षा आहे विधानपरिषदेच्या रिंगणात दोन्ही उमेदवार हे रायगडातील असून दोन्हींना आपणच बाजी मारु असा विश्वास वाटतो . मात्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेली मॅजिक फिगर कोणाच्या पारड्यात पडणार यावरच उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे यापुर्वी अनिल तटकरे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते . परंतु यदा अनिकेत यांना संधी दिली आहे . युवा नेते म्हणून त्यांनी रायगडात आपल्या कामाची छाप उमटवली आहे , असे असले तरी या निवडणुतीस रायगड , रत्नागीरी आणि सिंध दुर्ग अशा तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मते आवश्यक आहेत , त्यामुळे येत्या काळात रणधुमाळीला आणखी जोर चढणार आह

Post a Comment