दिवेआगर पर्यटन महोत्सव उत्साहात साजरा : विविध कार्यक्रम , स्पर्धेचा स्थानिकांबरोबर पर्यटकांनी घेतला आनंद


बोर्लीपंचतन, प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाच्या भूमीमध्ये दिवेआगर ग्रामपंचायत व सागरतट व्यवस्थापन समिती दिवेआगर व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दिवेआगर समुद्रकिनारी ४ व ५ मे असे दोन दिवस दिवेआगर पर्यटन महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले होते . याअंतर्गत आयोजित कार्यक्रमांना स्थानिकांसह पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या विभागामध्ये प्रथमच पयर्टन महोत्सव मोठ्या उत्साहात राबविण्यात आला . महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ४ मे रोजी सकाळी गणपती मंदिर ते तळाणी कार्यक्रम स्थळ समुद्रकिनारी शोभायात्रा काढण्यात आली होती . तसेच हॉटेल श्री गणेश बीच रिसोर्ट येथे रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या . सायंकाळी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . रात्री ' महाराष्ट्राच्या पाऊलखुणा ' या मराठी वाद्यवृंदांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . दुसर्या दिवशी शनिवारी , ५ मे रोजी सकाळी पाक कला स्पर्धा घेण्यात आली . दुपारी लहान मुलांच्या विविध स्पर्धा तसेच सायंकाळी ' जोडी तुझी - माझी ’ ही स्पर्धा आयोजित केली होती . रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम व बक्षिस वितरणाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला . यानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धेत मुलामुलींनी पुढाकार घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तर पाककला स्पर्धेच्या त कोकणातील चविष्ट पदार्थ बनवून महिलावगनेि स्पर्धेत पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला . पाक कला स्पर्धेत प्रथम पल्लवी वाणी , द्वितीय वृषाली बापट , तृतीय दिप्ती तोडणकर यांनी अनुक्रमे पारितोषिक पटकावला तर दिप्ती तोडणकर व शमनी बापट यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले तर संगीत खुर्चा स्पर्धेत प्रथम प्रीत गायक , द्वितीय चिन्मयी सहस्रबुद्धे , तृतीय स्मितेश  मयेकर यांनी तर ब्लकेट बॉल स्पर्धेत प्रथम आदर्श चोगले , द्वितीय आदित्य गवारे तृतीय दिव्यांशु सिंग तर चमच्या गोटी स्पर्धेत प्रथम सोहम कांबळे , द्वितीय स्वयम भगत , तृतीय स्मिथ दवटे यांनी बाजी मारली . रांगोळी स्पर्धेत प्रथम वृषाली बापट , द्वितीय कल्पेश पाटील , तृतीय गायत्री ठोसर यांनी बक्षिसे मिळवली . या सर्व विजयी मुला मुलींनी स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य दाखवले . त्यांना उपस्थित मान्यवर तुकाराम विरकूड , अनंत । राणे , प्रिया वाड प्रकाश दातार , सरपंच उदय बापट , उपसरपंच गता वाणी , केतकी केळकर आदि व ग्रामपंचायत सदस्य , सदस्या , सागर तट समिती सदस्य यांच्या हस्ते । बक्षिस देऊन गौरविण्यात आले . स्पर्धेच्या दोन दिवसीय पर्यटन महोत्सवाला स्थानिकांसह पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद लुटला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा