दिवेआगर , ता . १६ ( प्रतिनिधी ) :
भाजप शिवसेनेच्या हातात सत्ता देऊनही हाती काही लागले नसल्याने तुमच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या हातात सत्ता द्या , असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीवर्धनमध्ये केले . रायगड जिल्ह्याच्या दौच्यावर असलेले राज । ठाकरे यांनी मंगळवारी ( ता . १५ ) श्रीवर्धनमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे आवाहन केले रायगड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी स्थानिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्यांना भेटून सर्वाशी संवाद साधला . या वेळी त्यांनी श्रीवर्धनमधील समस्यांचा आढावा घेतला . दियी माणगाव रस्त्यांची झालेली दुरवस्था , आरोग्य सेवा , दियी पोर्टमध्ये स्थानिकांना रोजगार , तालुक्यात वाढती बेरोजगारी , मराठी भाषेचा मुद्दा , एलईडी मासेमारीमुळे कोळीबांधवांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली . या वेळी स्थानिक आमदारांना येथील समस्यांचा जाब विचारा , असा उलट सवालच त्यांनी पत्रकारांना केला . तुम्ही भाजप शिवसेनेला सत्ता दिली ; पण काय झाले ? ते काहीही सांगतात आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवता . एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा सगळे प्रश्न सुटतील असे राज ठाकरे म्हणाले .
Post a Comment