आंबेतमधील अवैध वाळु उत्खननाविरोधात महसुल विभागाची कार्यवाही: लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त



म्हसळा : सुशील यादव

अवैध वाळु हा महसुल प्रशासनास   कायमच डोकेदुखीचा विषय ठरला आहे अवैध वाळु उत्खननाविरोधात अनेक वेळा कारवाई करुन देखील आळा बसत नसल्याने कंटाळलेल्यां महसुल प्रशासनाने कंबर कसली असुन  काल बुधवार   दि. १६ मे रोजी श्रीवर्धन उप विभागीय अधिकारी प्रविण  पवार,खामगाव मंडळ अधिकारी मोरे,तलाठी पाटील यांच्या पथकाने आंबेत खाडीमध्ये कार्यवाही करीत तीन    सक्शन पंप (ऱक्क्म कि. 12लक्ष)जप्त केले .
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार आंबेतमध्ये सक्शन पंपाद्वारे राजरोसपणे वाळुचे उत्खनन होते व ही वाळु संपूर्ण म्हसळा, श्रीवर्धन  त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हयात देखील ट्रक द्वारे नेण्यात येते. मात्र एकदाच रॉयल्टी भरुन हे ट्रक मालक अनेक वेळा वाहतुक करतात याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दीसत असल्याने महसूल विभागाने शासनाचा लाखो रुप़यांचा महसूल बुडविणा-या या सक्शन पंपाद्वारे वाळु उत्खनन करणा-यांच़्या विरोधात  कार्यवाही करून  बारा लक्ष रुपयांचे सक्शन पंप जप्त केले
 सदर गुन्ह्याची नोंद गोरेगाव पोलीस ठाूण्यात करण्यात आली असून आरोपी सज्जाद हासवारे याच्या विरुद्ध भा.द.वि. ३७९, ५११ व गौण खजिना कायदा कलम २१ व भारतीय पर्यावरण कायदा १९९६ च्या कलम  १९१५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाअसुन पुढील तपास पोलिस निरीक्षक जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार ढोबळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा