म्हसळ्यात अनधिकृत टपऱ्यांचे वाढते साम्राज्य...


म्हसळा : महेश पवार

म्हसळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होताच . तत्कालीन प्रभारी मुख्य अधिकारी अर्चना दिवे यांनी नगर पंचायतीच्या मुख्यधिकारी पदाचा भार स्विकारताच त्यांनी एक आदर्श निर्णय घेऊन शहरातील अनाकृती बांधकामे टपऱ्या , दुकानासमोरील छप्पर या सर्वांचे अतिक्रमण हटविले होते . परंतु कालांतराने हळूहळू अनाधिकृत टपऱ्या दुकानासमोरील छप्परे ही वाढत चालली आहेत . त्याच्याकडे कार्यवाही करण्याची कोणतीही मानसिकता प्रससनाची दिसत नाही शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे बाजाराच्या गल्लीतील दुकानदार , आपल्या दुकानाच्या बाहेर मक्तेदारी प्राप्त करून अव्वासेसव्वा जागा व्यापल्याने ग्राहकाला येण्या - जाण्यास फार मोठी अडचण होत आहे . या अडचणीकडे नगर पंचायत का पाहत नाही हे गुलदस्तच आहे . त्यामुळे केलेले अतिक्रमण हे कितपत योग्य आहे हे विद्यमान नगरराध्यक्ष कविता बोरकर हे का पाहत नाही . तत्पूर्वी यापूर्वीचे नगराध्यक्ष दिलीप बाळू कांबळे यांनी अतिक्रमण हटवण्याचा धाडसी निर्णय घेतला त्याच निर्णयाने म्हसळा शहरातील असणारे अनाधिकृत टपच्या , अनाधिकृत बांधकामे असे अनेक प्रश्न मार्गे लागले होते परंतु आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे म्हसळा शहरामध्ये व्यापारी दुकानदार आपल्या मर्जीनुसार मोठ्याप्रमाणात जागा व्यापून आम्ही या जागांचे हिस्सेदार आहोत असे भासवत सर्वसामान्य जनतेला असा नहाम त्रास होत आहे . चक्क रात्रीच्या वेळी आपल्या दुकानाची जागा पुढे सरकवण्यासाठी रात्रीत बाधकाम करून मोकळे झाले आहे असे असताना या प्रकरणाकडे संबधीत प्रशासन व राजकीय मंडळ हुंकून सुध्दा पाहत नाही त्यामुळे शहरामध्ये आवो - जाओ राज अपणा अशा वृतीचा अवलंबन करताना सर्वच स्थरावर दिसत आहे मागील प्रमाणे जे अतिक्रमण हटविण्यात आले होते ते तसेच पुन्हा हटविणार की नाही हे पाहणे औचित्याचे ठरमार आहे 

मुख्याअधिकारी यांनी आमच्या व्यापारी वर्गाची सभा घेतली . पण त्या सभेस अनेक व्यापारी वर्ग गैरहजर होते . लावलेली सभा मुळात उशिरा सुरू झाली तरी देखील मी माझ्या व्यापारी वर्गाला सांगणार आहे आम्ही नेहमी सहकार्य करतो पण आमच्या गल्लीतील अतिक्रमण त्याच्या कित्येक पटीने भाजी गल्लीत अतिक्रमण आहे ते देखील अतिक्रमण हटवावे कारण पूर्वी दोन टेंपो पास होत होते परंतु आता एक टेंपो पास होणे कठीण जात आहे आम्ही सांगितलेल्या सुचना नक्कीच आमलात आणू . श्री . नंदकुमार सावंत, व्यापारी संघटना अध्यक्ष

मी शहरातील व्यापारी वर्गाची मिटिंग घेतली त्या मध्ये व्यापारी वर्गाला समज दिली आहे . आपण दुकानाच्या बाहेर अतिक्रमण केले ते आपण दहा दिवसाच्या आत स्वतः हटवा नाही तर आम्ही हटवू असे सांगितले आहे. अर्चना दिवे, म्हसळा नगरपंचायत प्रभारी मुख्याध्या अधिकारी 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा