प्रतिनिधी, म्हसळा
तालुक्यात एक नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो . नगरपंचायत , ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धोरणानुसार पाणी हे सार्वजनिक साधन असून प्रत्येक व्यक्तीस पिण्याचे पाणी मागण्याचा हक्क आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थाना ग्रामीण भागात कायमस्वरूपी सरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देयचे बंधनकारक आहे . हे सर्व असताना म्हसळा तालुक्यातील ५० टक्के पित . याबाबत जनता दूषित पाणी आहे प्रशासनाला कोणतेही सोयरेसूतक नाही . तालुक्यातील म्हसळा , मेंदडी व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत येणाऱ्या म्हसळा बौद्धवाडी , वाऱ्याचा कोंड , इदगा साठवण टाकी , कोकबळ , कोकबळ ( कृष्णवाडी ) , रुद्रवट केलटे , पानवे , कोझरी , तळवडे , विठ्ठलवाडी , पाभरे गौळण झरा , दुर्गवाडी आदीवासी वाडी कळकीचा कोंड , बौध्दवाडी , तोराडी , वाघाव भापट , खानलोशी , रोहिणी , आगरवाडा या गावांतील पाण्याची सूक्ष्मजीवीय परीक्षण करता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून आला आहे . बहुतांश पाणी नमुन्याचे तपासणीत आवश्यक कोली फॉम्संपेक्षा फारच कमी प्रमाण असल्याचे सांगण्यात आले . तालुक्यांत पंपींगद्वारे साठवण व अंर्तगत वितरण या पद्धतीच्या सुमारे ४० व पॅव्हीटीने पाणीपुरवठा करणाच्या २ नळ योजना . योजनांद्वारे ते २२ आहेत या सर्वच ग्रामपंचायत व नगर पंचायत हद्दीतील नागरीकाना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना तालुक्यातील बहुतांश नागरीकांना दूषीत पाणी पुरवठा होत आहे . ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाखाली विविध योजनांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी शुध्द मिळावे त्याचबरोबरीने साथ रोगास आळा बसावा यासाठी पाण्याच्या गुणवतेचे सनियंत्रण व सर्वेक्षणासाठी पंचायत समिती स्तर , ग्रामपंचायत ग्रामपातळोवरील ग्रामिण पाणी पुरवठा समिती असे भाग केले आहेत . परंतु तालुक्यांतून ग्रामपातळीवरील कमिटयांवर पंचायत समितीचे विशेष नियंत्रण नसते , अशी चर्चा आहे .
ग्रामपंचायतीच्या ७३ व ७४ राज्य घटना दुरुस्तीच्या आधारे शासनाच्या मागणी अधारीत योजना ( Demand Drive pproach ) धोरणानुसार ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परीषदेमार्फत ग्रामीण पाणीपुरवठांचे नियोजन , अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती केली जाते . - महादेव पाटील , माझी सभापती , म्हसळा
तालुक्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत्रांची यादी वरिष्ठांना सादर करणे व तालुक्यातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांची असते . - पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

Post a Comment