प्रतिनिधी, श्रीवर्धन
श्रीवर्धनला ताजी मासळी व सुक्या मासळीचे माहेरघर समजले जाते . त्यामुळे सुकी मच्छी व ताजी मच्छी खरेदी करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यामध्ये राज्यभरातील पर्यटकांची तसेच खेड्यापाड्यातील खवय्यांची मोठी गर्दी पहायला मिळत असते . सध्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या ठिकाणी जवळा , जीवना कोळीवाडा व भरटखोल ह्या ठिकाणी कोठंबीचे सोडे व वाकट्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे . कोकण म्हटलं की , भात आणि मासे हे त्याचे खाद्य असे सूत्र समजले जाते . त्यामुळे नेहमी मासे व भात खाणाच्या खवय्यांची पावसाळ्यामध्ये पंचायत होते . कारण शासनाने ठरवून दिलेल्या बंदीच्या कालावधीमध्ये मच्छिमार समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जात नाही . शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन मच्छिमार करित असतात . त्यामुळे या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मासे खाणाच्या खवय्यांची मोठी अडचण निर्माण होत असते . त्यामुळे पावसासाठी सुकी मच्छी साठवून ठेवावी लागते . ही सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी पर्यटक तसेच स्थानिक खेड्यापाड्यातील नागरिक श्रीवर्धन तालुक्याला अधिक पंसती देतात . श्रीवर्धन तालुक्यामधील जीवना कोळीवाडा दिघी , आदगाव , कुडगाव , दिवेआगर , भरडखोल , मुळगाव , दांडा या ठिकाणच्या मच्छिमार महिला या समुद्रामधुन मच्छिमार नौकेने पकडुन आणलेली ताजी मासळी खरेदी करून ती व्यवस्थितपणे सुकवतात . ताजी कोंळबी खरेदी करून ती अगोदर समुद्राच्या खाच्या पाण्याने स्वच्छ केली जाते . त्यानंतर लगेच बर्फमध्ये टाकुन रात्र जागवून चार चार किंवा त्यापेक्षा जास्त महिला एकत्र येऊन ती सेलली जाते आणि त्याचे सोडे काडले जातात सोडे काढल्यानंतर ते काढलेले सोडे स्वच्छ अशा जागेवर ते वाळत ठेवून सुकवले जाता . त्यामुळे ते कोलबीची व्यवस्थितरित्या काळजी घेऊन साफसफाई करून समुद्राच्या किनाच्यावर सुकवल्यामुळे हे कोळंबीचे सोडे दिसायला तर शुभ्र छान दिसतात . त्याचप्रमाणे खायलासुध्दा चविष्ट लागत असतात . तशाचप्रकारे रोज समुद्रामधुन पकडुन आणलेल्या ताजे बर्या , वाकट्या हेही समुद्राच्या पाण्यामध्ये दोन ते चार वेळा साफ करून त्या दोन दोन किंव्हा तीन ते चार एकत्र करून त्या बांधल्या जातात व समुद्राच्या किनाच्यावर बांबुच्या काट्याच्या केलेल्या साठ्यावर ते उन्हामध्ये सुकवल्याने दिसायलासुध्दा आकर्षक दिसतात . खायालासुध्दा अगदी चविष्ट असतात . जवळाही तशाच प्रकारे उन्हामध्ये सुकवल्याने त्यालाही मोठ्या प्रमाणवरती मागणी आहे . याची निगा व्यवस्थितपणे केल्याने ते जास्त दिवस टिकुन राहते लवकर खराब होत नाही . त्यामुळे अगोटीच्या तयारीसाठी सुकी मासी खरेदी करण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची नेहमीच श्रीवर्धन तालुक्याला पसंती असते .

Post a Comment