बोर्ली पंचतन, प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी श्रीवर्धन मार्गावरील वेळास या गावच्या हद्दीतील गावापासून ३ किलोमीटर आतमध्ये जंगलामधील एक बुजलेला झरा मोकळा केला . त्यामुळे तो पुन्हा खळाखळ वाहू लागला आहे . येथील तरुणांच्या ' हेल्प ग्रुप ने कौतुकास्पद काम करत , मुक्या वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे . वेळास गावापासून पुर्वेला ३ किलोमीटर जंगलामध्ये एका वडाच्या झाडाखाली पाण्याचा नैसर्गिक झरा आहे बारामाही वाहणाच्या या झच्याच्या पाण्याचा फायदा वन्य प्राणी , गुरे ढोरे व इतर प्राण्यांना पिण्यासाठी होत असे . विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या वडाच्या पाण्याच्या झच्यावर अनेक जनावरे पाणी पित असत . झच्याच्या मुखाजवळ अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने माती व झाडाच्या पालापाचोळायुक्त चिखल साचले होते त्यामुळे हाच झरा काही कालावधीपासून बंद झाला होता . याची माहिती वेळास गावातील व श्रीवर्धन तालुक्यातील एक सामाजिक संघटना हेल्प नृपचे प्रमुख धवल प्रदिप तवसाळकर मिळाली . त्यांनी याना कोणताच वेळ न घालविता हेल्प ग्रुपचे गावांतील सदस्य व तरूण ऋतिक वाजे स्वराज घोले , निखिल पवार प्रणित खेडेकर , अनीश अपराध प्रतिक दिवेकर , मुकेश बिरवाडकर , निलेश अडविलकर , सुदर्शन शिलकर , रूपेश भांजी यांना सोबत घेतले . गावातून टिकाव , फावडे घमेले व इतर आवश्यक साहित्य घेत जंगलात ३ किलोमीटर चालत जात वडाच्या पाण्याच्या झरा गाठला . श्रमदान करत , घाम गाळत , त्या झज्याच्या मुखावर साचलेला चिखल , माती व पालापाचोळा साफ केला व झरा पूर्ण मोकळा केला . त्यामुळे हा झरा पुन्हा खळखळ वाहू लागला . या झच्याच्या पाण्याने वन्यजीव गुरांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे हेल्प चुपच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीमध्ये कौतुक करण्यात येत आहे . यापूर्वीदेखील जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबड व बगळ्यास हेल्प चुपचे अध्यक्ष धवल तवसाळकर यांनी जीवदान दिले होते

Post a Comment