म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळ्यातील कुंभळे नदीत मगरीचे वास्तव्य असल्याची खात्री झाल्याने येथील ग्रामस्थांची झोप उडाली आहे . मौजे कोझरी व कुंभळे गावाच्या हद्दीतून वाहणान्या बारमाही कुंभळे नदीत परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी तर इतर नागरिक अन्य दैनंदिन कामासाठी ये - जा करत असतात . तर पाळीव गुरे व इतर जनावरे पाणी पिण्यासाठी येतात . मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथे पाणी पिण्यासाठी येणार्या जनावरांचे लचके तोडले जात असल्याने ग्रामस्थ हादरले आहेत . नदीत मगरीचे वास्तव्य असून तीच हे लचके तोडत असल्याची खात्री ग्रामस्थांना आहे २ मे रोजी गजानन विचारे यांची गाय पाणी पिण्यासाठी गेली असताला मगरीने तिचे तोंड फाडले तर दुसर्या दिवशी ३ मे रोजी राजेश धाडवे यांच्या गायीच्या पायाचा लचका तोडून तिला गंभीर जखमी केले आहे . गेल्या वर्षी मार्च माहिन्यात याच गावातील शेतकरी रमेश कदम यांचा बैल पाणी पिण्यासाठी गेला असताना मगरीने बैलाची मान धरुन जागीच ठार केले होते . ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्या बैलाला बाहेर काढले आणि म्हसळा वनविभागाकडे तक्रार केली . मात्र चौकशी होऊन केवळ नुकसान भरपाईची कारवाई करण्यात आली . निर्णय आजपर्यंत होऊ शकला ठोस नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र आहे मगरीच्या नाराजी . वास्तव्यामुळे परिसरातील नागरिक तसेच कपडे धुण्यास जाणाच्या खिया त्या नदीपात्रात जाण्यास घाबरत आहेत . कुंभळे नदी ही आंबेत खाडीच्या पात्राला जोडलेली आहे . त्यामुळे या खाडीतील मगरी कुंभळे नदीत आल्या असून , गतवर्षांपेक्षा यावर्षी त्यांची संख्या वाढली आहे . परिणामी आजवर अनेक गुराना प्राण गमवावे लागल्याचे राष्ट्रवादीचे वरवटणे गण अध्यक्ष सतीश शिगवण यांनी म्हटले आहे यासंदर्भात वन विभाग म्हसळा व रोहा यांना रितसर पत्रव्यवहार करून योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले . तर दुसरीकडे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत असल्याचा आरोप कोळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अमोल पेंढारी यांनी केला आहे वन विभागाने त्वरीत पावले उचलून योग्य तो बंदोबस्त करावा अन्यथा होणार्या परिस्थितीला जबाबदार संबंधीत प्रशासन असेल त्यांनी म्हटले असेही आहे

Post a Comment