शाळा पाडून नगरपंचायत कार्यालय उभारणार असल्याचे प्रकरण तापले
रा.जी.प. शाळा म्हसळा नंबर १ ची "माजी विद्यार्थी शाळा बचाव संघर्ष समिती" सुशील यादव यांच्या नेतृत्वात स्थापन
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत चे आलिशान कार्यालय रा.जी.प. शाळा म्हसळा नंबर १ हि शाळा पाडून बांधण्याचा ठराव नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला व याबाबतची कार्यवाही सुरु झाल्याची कुणकुण लागताच या शाळेचे माजी विद्यार्थी नगरपंचायतच्या या निर्णयावर चांगलेच संतापलेत. नगरपंचायतच्या या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी या शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी विद्यार्थी सुशील यादव यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी शाळा बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत ची सभा गुरुवारी(१० मे) श्री राम मंदिर येथे घेण्यात आली. या सभेमध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांनी म्हसळा नगरपंचायत विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. लवकरच म्हसळा नगरपंचायतच्या या निर्णयाविरोधात म्हसळा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांच्यासह रायगड जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे याना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती माजी विद्यार्थी शाळा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सुशील यादव यांनी दिली. कोणत्याही परिस्थिती या शाळेला धक्का लाऊन दिला जाणार नाही असा ठाम निर्धारच या सभेत उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केला. व या प्रसंगाला सर्वांनी एकजुटीने सामोरे जाण्याचे ठरले. तसेच अजूनही नगराध्यक्षा कविता बोरकर व नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सदर ठराव रद्द करावा अशी कळकळीची विनंती माजी विद्यार्थी गणेश हेगिष्टे यांनी केली. सदर सभेसाठी म्हसळा ग्रामपंचायत चे माजी सदस्य सुरेश कुडेकर, समीर करडे, म्हसळा तालुका भाजप उपाध्यक्ष भालचंद्र करडे , शिवसेना शहरप्रमुख अनिकेत पानसरे, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल साळुंखे, पत्रकार बाबू शिर्के, अरुण जंगम, वैभव कळस , यतीन करडे, निलेश करडे,विशाल सायकर, संतोष उद्धरकर, समीर लांजेकर, सौरव पोतदार, कौस्तुभ करडे,चेतन जैन, मयूर ढवळे, कल्पेश जैन, अनिकेत जैन, राहुल जैन यांच्या सहित अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
नगरपंचायत ने कार्यालय शाळा पाडून गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकून न बांधता कोंडवाडा पडून बांधावे. या कोंडवाड्याची जागा गेली अनेक वर्षे विना वापराची पडून आहे.
अनिकेत पानसरे , शिवसेना शहरप्रमुख , म्हसळा

Post a Comment