खरसई अपघातग्रस्तांना मदतीची आस ; दळवी व गायकर यांना कायमचे अपंगत्व : उपचारासाठी लाखोंचा खर्च


खरसई अपघातग्रस्तांना मदतीची आस ; दळवी व गायकर यांना कायमचे अपंगत्व : उपचारासाठी लाखोंचा खर्च 

प्रतिनिधी 

वेग मयदिचे उल्लंघन , ओव्हरटेक करण्याची घाई , तांत्रिक बिघाड असलेली गाडी चालवणे आदी अनेक कारणांमुळे एसटी प्रवास सुरक्षित असल्याच्या दाव्यावर पाणी फेरले गेले आहे शनिवारी ता २८ रोजी म्हसळा तालुक्यातील खरसई येथे झालेल्या अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे . हा अपघात दोन एसटी मध्ये झाला होता . यावेळी दोन सेमी लक्झरी एसटी बसचे समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये ३५ वर्षीय सुनौल गायकर यांचा हात डॉक्टरांच्या सल्ल्यांनी कापण्यात आले तर पायाला कायमस्वरूप अपंगत्व आले आहे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळ असणाच्या वांजळे येथील गायकर हे रहिवासी आहेत . घरातील एकमेव कर्त्या पुरुषाला कायमचे अपंगत्व आल्याने घरातील मंडळींना धक्का बसला आहे . दोन्ही बसेस ह्या श्रीवर्धन आगाराच्या होत्या . 
त्यातील एक बस ही नालासोपारा जात होती व दुसरी बस ही नालासोपारा वरून बोर्ली पंचतन कडे परतत होती . श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील दळविवाडी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन दळवी यांचे वडील बंधू दळवी यांना या अपघातात शारीरिक दुखापत झाली . दळवी यांनी आई रेखा बंधू दळवी या महाड येथील रानडे रुग्णालयात ऍडमिट आहेत . त्यांच्या ओठाला टाके पडले असून पाय फ्रेंक्चर झाला आहे शिवाय कमरेला सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे . भाजपा कामगार युनियन चे रायगड अध्यक्ष यांनी सांगितले की एसटी अधिकारी यांनी रुग्णालयात भेट दिली . मात्र आर्थिक मदतीबाबत कुणीही चर्चा केली नाही . आई वडील हे मुंबई  हुन नालासोपारा एसटी ने गावी परतत होते त्याच वेळी खरसई येथील अपघातात आईला मोठी शारीरिक दुखापत झाली आहे शिवाय खर्च ही जास्त होण्याची शक्यता आहे . अजूनही डॉक्टरांच्या मार्गदर्शन खाली उपचार सुरू आहेत . चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला होता . याबाबत अधीक माहितीसाठी श्रीवर्धन आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांच्याशी संपर्क केले असता होऊ शकला नाही . सुरक्षित प्रवास, प्रवाशांच्या सेवेसाठी ही बिरुदावली मिरवणाऱ्या एसटी प्रशासन कडून अपघात ग्रस्त प्रवाशांना मदतीची अपेक्षा आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा