म्हसळयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ...
म्हसळा : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन म्हसळा तालुक्यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी म्हसळा तालुका शासकीय ध्वजारोहण तहसिलदार रामदास झळके यांच्या हस्ते , पंचायत समिती म्हसळा येथे उपसभापती मधुकर गायकर यांचे हस्ते , म्हसळा नगरपंचात येथे नगराध्यक्षा कविता बोरकर , म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांच्या हस्ते , म्हसळा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड , जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग येथे अभियंता गांगुर्ल्ड यांचेहस्ते , जिजामाता शिक्षण संस्था येथे संस्थापक महादेव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले . कार्यक्रमाला पंचायत समितीचे सदस्य संदीप चाचले , सदस्या छाया म्हात्रे , जैन समाज अध्यक्ष सुरेश जैन , वाचनालयाच्या उपाध्यक्षा अपर्णा ओक सदस्या नायब रेखा धारिया , तहसीलदार भिंगारे , गटविकास अधिकारी वाय एम . प्रभे , तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी , मुख्याधिकारी अर्चना दिवे , नगरसेवक , नगरसेविका , विस्तार अधिकारी दिषीकर , आदी शासकीय अधिकारी , कर्मचारी , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment