श्रीवर्धन : दिवेआगर पर्यटन महोत्सवाची शानदार सुरुवात, पर्यटन महोत्सव भरवणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत...


श्रीवर्धन : दिवेआगर पर्यटन महोत्सवाची शानदार सुरुवात, पर्यटन महोत्सव भरवणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत...


दिवेआगर ग्रामपंचायत सागरतट अभियानातून राबवित असलेले विविध उपक्रम व पर्यटन महोत्सव यामुळे दिवेआगरच्या पर्यटनास याचा निश्चित फायदा होईल , असा विश्वास माजी सभापती लाला जोशी यांनी व्यक्त केला . दिवेआगर पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . दिवेआगर पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन दिवेआगरचे ग्रामस्थ व मुंबई येथील एक प्रसिद्ध उद्योगपती नाना तोडणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तर सरपच उदय बापट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . ४ व ५ मे असे दोन दिवस दिवेआगर समुद्रकिनारी चालणाच्या महोत्सवामध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.  यापूर्वी ५ - ६ वर्षापूर्वी दिवेआगर येथे आमदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून दोन वेळा पर्यटन महोत्सव घेण्यात आले होते . परंतु ग्रामपंचायतीच्या या विभागामध्ये माध्यमातून प्रथमच पयर्टन महोत्सव राबविण्यात येत असून , त्यामुळे दिवेआगर ग्रामपंचयत ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव राबविणारी रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे .
उद्घाटनपूर्वी याआधी दिवे - आगर सुवर्ण गणेश मंदिर ते तळाणी विभाग समुद्रकिनारा पर्यटन महोत्सव स्थळापर्यंत मोठी शोभायात्रा काढण्यात आली . यामध्ये महाराष्ट्राच्या परंपरा , महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती महाराज राजमाता जिजाऊ , राणी लक्ष्मी बाई खंडोबा , म्हाळसा , बानू यांच्या वेशभूषा केलेले तरुण मुलंमुली यांचा शोभायात्रेमध्ये सहभाग होता . तसेच दिवेआगर गावांतील ग्रामस्थदेखील शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते . यावेळी मुंबई येथील व्यवसायिक रामदास व्यंकटेश मी , श्रीवर्धन माजी सभापती लाला जोशी , उपसरपंच गीता वाणी , वसंत गन्द्रे , वसंत आवळसकर , सुभाष आवळसकर , गणपती देवस्थान समिती अध्यक्ष महेश पिळणकर , संतोष मांडवकर , सर्व ग्रामपंचायत व सागरतट समिती सदस्य , ग्रामस्थ , मोठ्या संख्येने उपस्थित होते . माजी सभापती लाला जोशी म्हणाले की , दिवेआगरला लाभलेला सुंदर समुद्रकिनाराही निसर्गाचे दिवेआगरला लाभलेले मोठे वरदान आहे मागील काही दिवसांपासून दिवेआगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेगवे . गळे उपक्रम राबविले जात आहेत , तर काही वर्षांपूर्वी दिवेआगर समुद्रकिनारी दोनवेळा बीच फेस्टीव्हल घेण्यात आले आता ग्रामपंचायतीने पुढाकार घेत हा महोत्सव राबवित असून अशा महोत्सव व इतर उपक्रमांतून दिवेआगरचे नाव पर्यटनदृष्ट्या निश्चित अजून उंचावेल व याचा फायदा दिवेआगरचा पर्यटन व्यवसायास मिळेल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा