श्रीवर्धत ; वेळास गावचा मानाचा राजा काळ भैरवनाथ...

श्रीवर्धत ; वेळास गावचा मानाचा राजा काळ भैरवनाथ

विजय कांबळे 
म्हसळ्यापासुन वीस एक किलोमीटर अंतरावर असलेल हे गावं म्हणजेच वेळास . या गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरव नाथ हे दैवत गावातील प्रत्येकाची या दैवतावर अपार श्रध्दा आहे या भगवंताचे वास्तव्य या गावात कसे झाले याबाबत अख्यायिका सांगितली जाते . वेळास गावाच्या वेशीवरच पीर बाबांच वास्तव्य असुन या बाबांवर हिंदु मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांची अपार श्रद्धा आहे या बाबांच्या दग्र्यावर प्रत्येक दिवशी न चुकता आजही गावातील हिंदु धर्मिय बांधवांडून श्रद्धेने पुजा - अर्चा केली जाते . गंगेश्वराच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागे पीर बाबांचे दोन स्थान आणि दिवे आगर वेळासाच्या गणपती मंदिराच्या डाव्याबाजुला एक अशी भक्कम चार स्थाने गावाच्या रक्षणासाठीअसल्याचे सांगितले जाते . आपण थोडे पुढे गेलो की , गावाच्या उजव्या बाजुलाच हनुमंताचे मंदीर असुन गावकरी मोठ्या भक्तिभावाने त्याचा उत्सव साजरा करतात . आणखी पुढे आगर वेळास गावात शिरतानाच दिघी रोडच्या डाव्याबाजुला स्वयंभू गंगेश्वराच स्थान असुन त्याठीकाणी आता गावकडऱ्यांनी मंदिर बांधले आहे अतिशय जागृत असे हे देवस्थान असल्याची भाविकांची श्रध्दा आहे . अंदाजे २०० वर्षापुर्वीपासून येथे भैरवनाथाचे वास्तव्य होते . असे दाखले मिळतात . गावातील गावकर्यांकडून अशी माहिती मिळते की , आता ज्याठीकाणी श्री काळभैरवनाथाचे वास्तव्य आहे त्याठिकाणी खुप घनदाट अशा झाडीत जाऊन एक गाय आपल्या खुरांनी जागा साफ करायची . असा तिचा कायम नित्यक्रम ठरलेला असायचा . त्यावेळी गावकन्यांनी ही गाय त्याठिकाणी रोजच अशी जागा साफ करण्याचा प्रयत्न का करते , अशी त्यांच्या मनात शंकाकुशंकांनी जागा घेतली . मग गावकर्यांनी ठरवल की , आपण ही गाय अशी रोज जागा एकाच ठीकाणी जाऊन साफ का करते . यावर बारकाईने लक्ष ठेवयाचे असा निर्णय गावकन्यांनी घेतला . ठरल्यानुसार त्या गायीवर पाळत ठेवली गेली . दुसऱ्या दिवशीही ती गाय त्याठिकाणी आपल्या खुरांनी जागा साफ करु लागली . गावकरी ही ते दृश्य पाहुन अवाक झाले . ते पाहुन आपआपसात कुजबुजु लागले . मग ती गाय त्या ठिकाणाहून गेल्या नंतर गावकरी त्या घनदाट झाडीतुन वाट काढत काढत , गाय ज्या ठिकाणी तिच्या खुरांनी मात ओढून जागा साफ करण्याचा प्रयत्न करत होती त्याठीकाणची जागा लगबगीने साफ कररु लागले . असे करता करता अचानक गावकच्यांच्या नजरेस एक पाषाण आला . पाहतात तर काय ? त्याजागी आकार असलेला तेजस्वी साक्षात पाषाण होता . गावकरीही ते पाषाण पाहुन खूप आनंदी झाले . लगबगीने ही वार्ता गावातील लोकांना समजली . बघता बघता गावातील जी काही मंडळी होती तीही आता जमा होऊ लागली होती . पण मनात प्रश्न निर्माण झाला होता की , हे नेमके कोणत्या देवाचा पाषाण आहे ? हे कळायला मार्ग नव्हता . मग जाणकार मंडळीनी इतर देवालयात जाऊन माहीती घेतली , त्यावेळी समजल की ते साधारण पाषाण नाही तर साक्षात श्री काळभैरवनाथाच गावात वास्तव्य झाल आहे . हे समजलं मग मात्र नंतर विधीवत पुजा करुन गावकर्यांनी त्याठीकाणची जागा मोकळी केली . छानस टुमदार मंदीर गावकर्यांनी मेहनत घेऊन उभा केला . 

खुपच सुंदर अस हे देवालय . गावात देवाच्या आगमनाने सर्वत्र आनंदीआनंद वातावरण होतं . रोजचं मंदिरात येणं जाणे सुरु होऊ लागलं . या मंदिराचा वैशिष्टय असं आहे की , दक्षिण काशी आपण म्हणतो त्या हरीहरेश्वरातील काळभैरवनाथाची मूर्ती आणि वेळास गावातील देवाची मुर्ती ही उत्तरमुखी आहे आपण जर सर्वे गावातील काळभैरवनाथाच्या मंदिरात कधी गेलात तर ती मूर्तीआपल्याला दक्षिणमुखी पाहिला मिळेल . तर ही शक्ती वेळास येथील काळभैरवनाथाची असुन खुप श्रद्धाळु लोक दुरहुन या गावात दर्शनासाठी येत असतात . काळभैरव ज्याला प्रसन्न होतो त्याला दुख चिंता कधीच नसते मात्र त्याच नामस्मरण करण महत्त्वाचे असल्याचे सांगतात . मात्र हे मंदिर खुपच सुंदर बांधले असुन बरोबर समोरच बारमाही पाणी असलेली विहीर असुन बाजुलाच सत्य आसरांचे स्थान आहे . चैत्र पौर्णिमेला बरोबर रात्रीच्यासुमारास गावकरी तीन मानाच्या परड्या अर्पण करीत असतात एक खाडीला एक तळ्यावर आणि एक मंदिराच्या आवारात सत्य आसरा आहेत त्याठीकाणी मानपान दिला जातो . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा