प्रतिनिधी, म्हसळा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारी म्हसळा आगमनावर भाऊक झालेल्या शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचे वाघ आला म्हणून घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचे स्वागत केली.त्तर दुसरीकडे राज ठाकरे हे म्हसळा शहरामध्ये फक्त पुष्पगुच्छ घेण्यापुरातच थांबले असल्याने खेड्यापाड्यातून आलेल्या मनसैनिकांमध्ये मात्र नाराजी पसरली असल्याचे चित्र समोर आले आहे.याबात सविस्तरपणे वृत्त असे की,कृष्णकुंजातून १४ मे पासून रायगड दौऱ्यावर कार्यकर्त्यांसोबत सवांद साधण्यासाठी बाहेर पडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे १५ मे रोजी म्हसळा शहरातील दिघी नाक्याजवळ आगमन होताच,त्यांना पाहून भाऊक झालेले शिवसेनेचे माजी युवा शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर व इतर शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशी घोषणा देण्यास सुरवात केली.यामुळे काहीकाळ त्याठिकाणी हास्याचे वातावरण निर्माण झाले होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे म्हसळा शहरात येणार म्हणून रात्रीपासूनच कार्यकर्त्यांनी संपूर्ण रस्त्यावर पक्षाचे झेंडे लावण्याचे काम पूर्ण केले .पदाधिकार्यांनी त्यांच्या हस्ते इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश ठेवला असताना राज ठाकरे मात्र म्हसळा शहरामध्ये फक्त पुष्पगुच्छ घेण्यासाठी थांबले असल्याने सकाळपासून त्यांच्या दर्शनासाठी थांबलेल्या मनसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली तर इतर पक्षातून प्रवेशसाठी आलेले कार्यकर्ते प्रवेश न करताच घरी गेल्याचे पहावयास मिळाले.यामुळे राज ठाकरे पक्षासाठी संवाद दौरा होता की वाद दौरा होता हे मात्र कार्यकर्ते समजू शकले नाहीत.
म्हसळा पोलीस नेत्यांसाठीच….
म्हसळा शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यास पोलीस खाते अपयशस्वी होत असल्याचे चित्र असताना अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार म्हणून सामुर्ण म्हसळा शहरातील रस्ता रिकामा करण्यात आला.जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात वारंवार वाहतूक कोंडी होतअसताना पोलीस ठाण्यात बसलेले असायचे तेही अचानक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले.यामुळे पोलीस प्रशासन हा सामान्य माणसांसाठी आहे की नेत्यांसाठी हे शहरातील जनतेला समजू शकले नाही.
Post a Comment