म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा शहरात वारंवार होणार्या वाहतूक कोंडीला पोलीस प्रशासनातील निष्क्रीय कर्मचारी जबाबदार असून शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा ; अन्यथा शहरात रास्ता रोको करून संपूर्ण वाहतूक जाम करू , असा इशारा युवासेनेचे माजी शहर अधिकारी आणि वाहतूक संघटनेने तहसिलदार आणि म्हसळा पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे दिला आहे म्हसळा शहरामध्ये पोलिसांच्या नियोजनाअभावी आणि बेकायदेशीर दिखी पोर्टच्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे . सदर वाहतूक कोंडीचा फटका शहरातील नागरिकांसहीत तालुक्यातून येणार्या वृद्धांना बसत आहे म्हसळा पोलिसांनी शहरात होणाव्या वाहतूक कोंडीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास येत्या काही दिवसांत शिवसेना आणि शिवसेना वाहतूक सेनेमार्फत शहरातील रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवसेनेचे माजी शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांनी दिली . या आंदोलनाबाबत शिवसेनेतर्फ तहसिलदार आणि म्हसळा पोलिसांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपतालुकाप्रमुख अनंत कांबळे , अवजड वाहतूक सेना अध्यक्ष शाम कांबळे , उपाध्यक्ष संतोष सुर्वे , संपर्कप्रमुख गजानन सुर्वे , माजी अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर , दिपल शिर्के , उपशहरप्रमुख अक्रम साने , सरपंच अनंत कांबळे आदी उपस्थित होते .
Post a Comment