मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हसळ्यात ; कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण...


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवार १५ मे रोजी म्हसळ्यामध्ये येत असून या दौर्यात ते म्हसळा व श्रीवर्धनधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती , ज्येष्ठ नागरिक ,  शेतकरी यांच्याबरोबर अनौपचारिक संवाद साधणार आहेत . त्याचबरोबर मनसे पदाधिकारी व कार्यकत्यबरोबर पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मनसेचे म्हसळा संपर्क प्रमुख  शेखर धोंडू सावंत यांनी दिली आहे.
तसेच पुढे ते दिघी पोर्ट ला भेट भेट देणार आहेत. राज ठाकरेंचा हा म्हसळा श्रीवर्धन दौरा कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी देऊन जाईल हे निश्चित. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे बोलले जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा