श्रीवर्धन : मिनीबसची बलेनोला धडक ; मिनीबस चालक फरार


Y

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे गालसुरे काठी हददीत रस्त्यावर एक बलोनो गाडीला जोरदार धडक देऊन मिनीबसचालक पसार झाला . बलोनो गाडी व मिनीबसच्या जोरदार धडकेने रस्त्यालगतच्या गटारामध्ये बलेनो गाडी पलटी झाली . मात्र जीवितहानी टळली . श्रीवर्धन दांडा येथील बाबु चौल हे बलेनो घेऊन हरिहरेश्वर दक्षिण काशी हया ठिकाणी जात असताना गालसुरे निगडी काठी या दोन्ही गावाच्या मधील रस्त्याने जात असताना भरधाव येणारी मिनीबस ( सफेद रंग , एम . एच . १२ पूर्ण नंबर माहिती नाही ) ही हरिहरेश्वर येथून येत असताना चालकाने ओव्हरटेक करत बलेनो गाडीला जोरात कट 
मारली आणि फरार झाली . मात्र यामुळे बलेनो गाडी त्या रस्त्याच्या कडेवरील एका गटामध्ये जाऊन अडकली बलेनो गाडीचा मालक बाबु चौले यांनी कशीबशी गाडीही वाचवली व आपला जीवही वाचवला अन्यथा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती गट रामध्ये पडलेली बलेनो गाडी तेथील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली . या गाडीचे नुकसान झाले असून गाडी मालकाच्या छातीला गाडीची स्टेरिंग लागून दुखापत झाली आहे ते सध्या येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा