आज महाराष्ट्रव्यापी महादौऱ्याच्या सुरुवातीच्या वसई येथील विराट जाहिर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे:
महाराष्ट्र दौऱ्यात केवळ एकच सभा घेणार, ती हिच. आज सुरू झालेला दौरा ऑगस्ट महिन्यात संपणार
आज ट्विटरवर मी एक चित्रफीत टाकली आहे ज्यात १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य झाल्यावर मराठी माणसांनी कसा जल्लोष त्या चित्रफितीत दिसतोय. तो जल्लोष पाहून माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं
देशात विषयांची कमतरता नाहीच, विषयांचे पुरवठामंत्री खूप आहेत
महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो याचा सार्थ अभिमान!
आज आपली जी ओळख आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे, त्या शिवरायांना काय वाटत असेल महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहून?
औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील महाराष्ट्रात आला होता, शिवाजी महाराज नावाचा विचार मारायला आला होता, पण ते त्याला शक्य झालं नाही पण आज मराठी समाज जातीजातीत विभागला गेलाय, तो एकमेकांशी जातीवरून भांडतोय
आपण जातीपातीवरून भांडतोय आणि त्यामुळे बाहेरून आलेल्यांचं फावतंय. बाहेरून येणाऱ्या संकटांबाबत आपण आजही बेफिकीर. महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे
महाराष्ट्रात आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत,पण आरक्षण लागतं कशाला तर शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसाठी. सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत, सरकारी शाळा, कॉलेज बंद होत चालली आहेत, खाजगी शाळांत आरक्षण नाही.. तरी आपण आरक्षणासाठी भांडतोय?
मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे!
वसईत उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आलेल्यांनी बांधलेल्या चाळींचा विषय मी पाडवा सभेत मांडला, नंतर कारवाईचं नाटक सुरु झालं आणि कारवाई केली तर मराठी माणसांच्या जमिनींवरच्या चाळींवर, परप्रांतीयांच्या चाळींवर का नाही? कुंपणच शेत खातंय
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?
बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि १९६० साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे. बुलेट ट्रेनला आमचा विरोध आहे आणि राहणार!
देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, ते काय निर्णय घेणार, मोदी आणि शहा जे सांगणार त्याला हे मान डोलावणार. फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं
नरेंद्र मोदी म्हणाले आख्ख्या देशात आम्ही वीज पोचवली, मग २०१४ च्या आधी आम्ही काय अंधारात होतो का? काय खोटं बोलता?
भारतीय डॉक्टरांच्या विषयी लंडन मध्ये जाऊन अपमानास्पद विधानं करता, लाज नाही वाटत तुम्हाला आपल्याच माणसांबद्दल बाहेर जाऊन वाट्टेल ती विधानं करायला. मग राफेल विमानांच्या व्यवहाराविषयी का नाही बोलत?
महाराष्ट्रात ४ लाख शौचालयं बांधली असले फुटकळ दावे मुख्यमंत्र्यांनी केले, महाराष्ट्रात पाणी नाही तरी पण असले दावे मुख्यमंत्री करत आहेत
मुख्यमंत्री म्हणाले १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, बहुदा मुख्यमंत्री रस्त्यावरचे खड्डे पण विहीर म्हणून मोजत असणार
सध्या नोटांचा तुटवडा सुरु आहे, आणि यावर सरकारने उत्तर दिलं की नोटांची शाई संपली आहे, पण नोटा छापायचं काम सुरु आहे. शाई संपली अशी उत्तरं कशी देऊ शकता? हे काय वाण्याचं दुकान आहे का? कॅशलेस इंडियाचं काय झालं?
जर कॅशलेस इंडिया आहे मग भारतीय जनता पक्षाकडे निवडणुका लढवायला,पैसे वाटायला कॅश कुठून येते?
मोदींच्या मनमानी कारभारामुळे देशातील जनता त्रस्त, मोदींसारखा माणूसघाणा पंतप्रधान पाहिला नाही...ना कुणाशी बोलायचं ना कुणाचं ऐकायचं
तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरायला लागलेत. तुमच्या मुलांच्या करता उत्तम शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळोत न मिळोत याचं या सत्ताधाऱ्यांना किंवा मागच्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणंदेणं नाही.
भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्वाच्या गप्पा मारतं, पण आझाद मैदानाच्या मोर्च्याच्या वेळेला जेंव्हा मुसलमानांनी पोलीस भगिनींवर हात टाकला, तेंव्हा त्याचा निषेध करणारा मोर्चा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता, या अश्या मुसलमानांवर जी दहशत बसली ती आमच्यामुळे बसली
बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे हे महाराष्ट्रात मोहल्ले तयार करत आहेत, ते काय करत आहेत, कुठून आलेत याचा पत्ता नाही, पण अश्या धोकादायक मोहल्यांविरोधात देवेंद्र फडणवीस कारवाई करत नाहीत?
मराठी माणसाच्या मनगटातल्या ताकदीला काय झालं, असे बुळबुळीत का वागताय, कोणीही यावं मराठी माणसावर वरवंटा फिरवावा हे आपण का खपवून घेतोय?
नाणार मध्ये प्रकल्प येणार आहे, हे कोकणातल्या आपल्या लोकांना माहित नाही पण गुजरातच्या काही लोकांना नाणार मध्ये रिफायनरी येणार हे कसं कळतं? त्यांना जमिनी घ्या, मग प्रकल्प आल्यावर मोठ्या फायद्यासाठी विका हे कोण सांगत?
जगातल्या सगळ्या लढाया या जमिनीसाठी झाल्यात. आज कोकणातील मराठी माणूस, ठाण्यातील मराठी माणूस आपल्या जमिनी चार पैश्यांकरता फुकून टाकतोय. उद्या तुमच्या जमिनी जातील. इंच इंच जमीन विकली जाईल आणि आपल्याच राज्यात बेघर होऊ.
महाराष्ट्रात इथे पालघर मध्ये गुजराती पाट्या का लागतात? इथे बाहेरून येऊन राहिलेल्यांना गुजराती पाट्या लागतात कशाला? गुजरातमध्ये मराठी पाट्या लावल्यात तर गुजरातला सहन होईल का?
बाहेरून आलेल्या लोकांनी इथं शहाण्यासारखच राहावं, नाही तर मी हे बोलतच राहणार आणि असंच काम करत राहणार
मराठी बांधवानो भगिनींना माझी विनंती आहे की बेसावध राहू नका. चिमाजी अप्पांच्या भूमीत आपण जमलो आहोत. चिमाजी अप्पांचं शौर्य तुम्ही दाखवा
तुम्ही तुमच्या जमिनी मुंबई बडोदा एक्प्रेस रस्त्याकरता देऊ नका, बुलेट ट्रेन करता देऊ नका. आणि तरीही जबरदस्ती झाली तर रूळ उखडण्यासाठी चिमाजी अप्पांचं शौर्य या भूमीत परत दाखवा

Post a Comment