अस्वच्छ शिवशाही बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास : श्रीवर्धन आगारचा प्रताप


अस्वच्छ शिवशाही बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास : श्रीवर्धन आगारचा प्रताप 

म्हसळा प्रतिनिधी 

श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या श्रीवर्धन मुंबई शिवशाही बसची स्वच्छता न केल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीवर्धन येथून सकाळी ५ वाजता सुटणाऱ्या कंत्राटी सेवेवर घेतलेल्या बस क्र .एम एच 03 सि पी 2793 ही बस आज (दि १६ एप्रिल) रोजी मुंबई करीत मार्गस्थ झाली मात्र अंतर्गत स्वच्छता न केल्याने बसमध्ये दुर्गंधी व कचरा असल्याने प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस सर्वसामान्य प्रवाश्यांना एस टी कडे आकर्षित करत आहेत माफक दरात वातानुकूलित सेवा व सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने प्रवाशी वर्गाचा या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मात्र महामंडळाचे कर्मचारी आणि ठेकेदार यांची स्वच्छतेबाबत पूर्णपणे जबादारी असताना प्रवासीवर्गाच्या सोयी सुविधाकडे दुर्लक्ष  करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे याकडे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.अन्यथा प्रवासी वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने शिवशाही बस सुरू केली तोच प्रवासी वर्ग अस्वच्छ,वेळापत्रक विलंब शा अनेक कारणाने एस टी कडून दुरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शिवशाही बसने प्रवास सुरु केल्यानंतर लक्षात आले की आतून बसमध्ये घाण पसरली आहे त्यावर माती टाकून ठेवलेले पाहायला मिळाले प्रत्येक असनाच्या मागे कागद प्लास्टिकचे रॅपर अशा परिस्थितीत ना इलाज म्हणून प्रवास करावा लागला --प्रवासी

बस उशिरा आगारात आली असावी आम्ही सकाळी बसचा ताबा घेऊन कामगिरीवर निघालो बसची स्वच्छता झाली पाहिजे पण आम्ही काही करू शकत नाही--
वाहक व चालक 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा