म्हसळा शहर वाहतूक कोंडीने त्रस्त : पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत , लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
म्हसळा म्हटले की वाहतूक कोंडी हे नित्याचे झाले आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने अनेक प्रश्न सुटत असतात ; परंतु म्हसळा येथील वाहतूक कोंडी फुटायचे नाव घेत नाहीये . ही समस्या जैसे थे असून , प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत त्यामुळे म्हसळ्यातील वाहतूक कोंडी हा खुला व सोशल मीडियावरील चर्चेचा विषय होत आहे.
सातत्याने होणारी वाहतूक कोंडी ही पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होत आसल्याची चर्चा आहे शहरातील पाभरे फाटा ते दिघी नाका या वाहतूक कोंडीच्या महत्वाच्या ५०० मीटर रस्त्यावर दोन वाहतूक पोलीस कार्यरत असताना वाहतूक कोंडी होतेच कशी ? हा महत्वाचा मुद्दा आहे वाहतूक कोंडी झाल्यावर पोलीस गायबच होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे सतत होणाच्या वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणेही कठीण होत आहे पाभरे फाटा ते दिघी नाका हा रस्ता अनूद दोनही बाजूने उंच इमारती , प्रशासकीय कार्यालय , नगरपंचायत कार्यालय , अन्य बैंका अशी महत्वाची कार्यालये असल्याने सातत्याने रहदारीचा असतो . तर याच मुख्य रस्त्यालगत मोटारसायकल , रिक्षा व अन्य वाहने अत्यंत बेशिस्तपणे लावली जातात . जुन्या असणाच्या व नव्याने बांधण्यात येणाच्या इमारती रस्त्यापर्यंत बांधलेल्या व इमारतीला वाहनाचा धक्का लागायला नको म्हणून इमारतीपुढे भलामोठा दगड असे प्रकार असल्याने पाभरे फाटा ते दिघी नाका हा परिसर हा वाहतूक कोंडी होणारा पट्टा आहे या मागांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते . यातून मार्ग काढणे म्हणजे स्थानिक पादचाच्यांसाठीही डोकेदुखी हात . श्रीवर्धनसाठी पर्यायी असणारा म्हसळा बायपासचा रस्ता अंतराने जास्त व निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे दिघी पोर्टकडे जाणारी छोटी - मोठी वाहतूक तसेच श्रीवर्धन - दिवेआगर श्री क्षेत्र हरिहरेश्वर व आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिघी बंदर येथे जाण्यासाठी छोटे वाहतूकदार म्हसळा शहरातून जाणे पसंत करीत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत .
पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नगरपंचायत , व्यापारी , वाहतूकदार संबंधितांची वाहतूक कोंडी ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक बैठक घेणे आवश्यक मात्र नेमके हेच आहे होताना दिसत नाही .
- महादेव पाटील . माजी सभापती पंचायत समिती - म्हसळा

Post a Comment