चिखलप येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातील चिखलप या गावी सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि ग्रामस्थ व महिला मंडळ चिखलप यांच्या संयुक्त विद्यमाने २२ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलप येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तपासणी धरम्यान एकुण १२२ लोकांनी सहभाग घेतला यामधून डोळ्यांच्या अॉपरेशन साठी २० लाभार्थी आणि चेष्मा साठी ३५ लाभार्थी तपासणी धरम्यान चाचणी झाली . या नेत्रतपासणी शिबीराचा चिखलप परिसरातील नागरिकांनी घोणसे कानसे वाडी, देवघर कोंड, देवघर, चिखलप आदिवासी वाडी, देहेन , भापट, चिखलप, सरवर, ताम्हाणे करंबे, निवाची वाडी, घाणेरी कोंड, देहेन नर्सरी यांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले. . .
यावेळी सेल्प हेल्थ अॅन्ड प्लस एम पॉवरमेंट मुंबई या संस्थेचे प्रमुख मडिवाले साहेब, बावस्कर साहेब , डॉ सुहास हळदीपूरकर आणि सर्व युनिट चिखलप ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष हरिश्चंद्र मुंडे, विजय शिंदे, अमृत बाबूराव गिजे, संतोष शिंदे, रघुनाथ मुंडे, गोपाळ शिंदे, प्रशांत निर्मल दिलिप शिंदे, बंदिनी बाळकृष्ण मुंडे यावेळी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ चिखलप यांनी उत्तमरीत्या सहकार्य केले आणि शिबीर यशस्वीपणे पार पडले.

Post a Comment