सत्तेत असतानाही सुचवलेली सामाजिक कामे न झाल्याने भाजप पदाधिकारीयाचा पालकमंत्री यांच्याकडे राजीनामा सादर
मुरूड जंजिरा : अमूलकुमार जैन
सत्तेत असतानाही सुचवलेली सामाजिक कामे न झाल्याने भाजप कार्यकर्ते वैतागले आहेत. पेण तालुक्यातील भाजप सरचिटणीसाने तर पदाचा राजीनामा देत भाजप सरकारविरोधात उपोषण सुरू केले आहे. मोहन पाटील असं या कार्यकर्त्याचे नाव असून भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने ते निराश झाले आहेत. समस्या २१ मे पर्यंत सुटली नाही तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा त्यांनी इशारा दिलाय.रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी त्यांच्या सत्तेच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा म्हणजे एक प्रकारे सरकारविरोधात मारलेली चपराक आहे.
पेण तालुक्यांतील दादर हे गाव दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण याच्याकडे लेखी निवेदनादवारे अनेक वेळा केली होती. पालकमंत्र्यांनी आपल्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळेच त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
पाताळगंगेच्या कुशीत वसलेलं पेण तालुक्यातील दादर हे गाव एककाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. १९८९ साली आलेल्या महापुरामध्ये गावाच्या सभोवताली असणारी तटबंदी वाहून गेली आणि १२ हजार हेक्टर जमिनीमध्ये खारे पाणी शिरले तसेच गावांतील बरीच घरे वाहून गेली. गावातील शेती नापीक झाल्याने इथल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. शासन इतर जिल्हयांतील शेतक-यांना नुकसान भरपाई देते मात्र दादर गावाला ती मिळत नाही. इतकी वर्ष काँग्रेसचे सरकार होते, आता भाजपचे सरकार आले आहे तरीही मदत मिळत नसेल तर काय उपयोग असा सवाल पाटील विचारत आहेत

Post a Comment