प्रमोद घोसाळकर पुन्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तर नाजीम हसवारे यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी निवड:जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण
म्हसळा : निकेश कोकचा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचे एकच नाव पुन्हा जिल्हाध्यक्षपदी आल्याने त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होणे निश्चीत झाले आहे.याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून आलेल्या निरीक्षक यांनी सांगितले. तर म्हसळा तालुकाध्यक्ष नाजीम हसवारे यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.नाजीम हसवारे यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच म्हसळा तालुक्यासाहित संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
कर्जत येथे आयोजित सभेमध्ये यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे,राष्ट्रवादी नेते तथा निरीक्षक बबन जाधव,कर्जतचे आ.सुरेश लाड,जिल्हापरिषद अध्यक्षा अदिती तटकरे,माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल,उरणचे प्रशांत पाटील,जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर,युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे,महमद मेमन,आतिक खतीब,महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका चिपळूणकर,समाजकल्याण सभापती उमाताई मुंढे तसेच सर्व जी.प.सदस्य,पंचायत समिती सभापती,उपसभापती,नगराध्यक्ष तथा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायगड जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारणी तथा संपूर्ण तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी दिनांक २२ एप्रिल रोजी कर्जत येथे आ.सुरेश लाड यांच्या कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवडणूक घेताना फक्त प्रमोद घोसाळकर यांचे एकाच नाव आल्याने त्यांची पुन्हा निवड निश्चीत झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.तर राष्ट्रवादीचे म्हसळा तालुकाध्यक्ष तथा युवा नेतृत्व नाजीम हसवारे यांना जिल्ह्यात बढती देत थेट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे.
नाजीम हसवारे यांना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पद देण्यात आल्याने रिक्त झालेल्या म्हसळा तालुकाध्यक्ष पदी चुरस वाढण्याची शक्यता आहे.तालुकाध्यक्ष जागी नव्याने प्रवेश केलेल्यांना की राष्ट्रवादीचे काम निष्ठेने केलेल्यांची वर्णी लागते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment