म्हसळा स्टेट बँकेत ग्राहक सेवा ठेपाळली : ग्राहक अंदोलनाच्या पवित्र्यात
म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा शहरांतील राष्ट्रीय बँकेतील अग्रणी असणाऱ्या स्टेट बँक
शाखेने ग्राहकाना प्रचंड वेठीस धरले आहे . बँक पासबुक भरणे, नवीन पासबुक,
पासबुकला बार कोड लावणे, पैसे काढणे /भरणे या कामांसाठी ग्राहक गेला असता
कामे तासन तास होत नाहीत. या बाबत कर्मचारी ,मॅनेजर याना विचारले असता ही
मंडळी सर्व प्रथम ग्राहकाला उध्दट वर्तणुकीनी नाउमेद करतात व सातत्याने
दुरुत्तर करतात अशा तक्रारी बँकेचे ग्राहक
परवेज धरटकर, नासीर फौजदार, जावीद बुडन, हबीब बशारत, रामचंद्र शिंदे,
लियाकत करदेकर यानी आमचे प्रतिनिधी समक्ष बँकेचे मॅमेजर राहुल कटके यांच्या
जवळ केल्या.
सिटीझन
चार्टर या बँकांच्या सकल्पनेला या मॅनेजरने बगल देत आशा आशयाचा बोर्डच
लावला नाही तर नागरीकांसाठी व ग्राहकांसाठी असणारा माहीतीचा आधिकार हा फलक
सर्वाना दिसेल असा लावणे आवश्यक असताना चक्क मुतारी जवळील जागेत दिसणार
नाही अशा स्थितीत लावला आहे अशा तक्रारी ग्राहकांच्याआहेत.बँकेचे ए.टी.एम्.
हे अनेक वेळा बंद व चालू असेल तेंव्हा पैसे नसल्याच्या ग्राहकांच्या
तक्रारी आहेत. तीच तऱ्हा अॅटोमॅटीक पासबुक फिलींग मशीनची आहे.सीटीझन चार्टर
प्रमाणे ग्राहकाना सेवा मिळाव्यात असे रिर्झव्ह बँकेचे स्पष्ट आदेश
आसताना मॅनेजर नियमाना काळे फासत आहे अशी ग्राहकांची तक्रार आहे . अनेक
वेळा ग्राहक मागेल तेवढी रक्कम ग्राहकाना देत नाही, बँके देईल तेवढेच
घ्यावे लागतात .
माझ्याकडील कर्मचाऱ्यापैकी एकाची बीहार व दुसऱ्याची राजस्थानला बदली झाली आहे. वरीष्ठ व्यवस्थापन त्याना सोडत नसल्याने ते ग्राहकांजवळ दुरुत्तरे करतात. मलाही नोकरीची गरज नाही मला बाहेर १० पट जास्त पॅकेजची ऑफर आहे.
राहुल कटके, शाखाधिकारी स्टेट बँक म्हसळा.
१९४९ च्या बँकींग अधीनीयमानुसार बँकेने कर्ज देण्याकरीता जनतेकडून मागणी करताच चेक ड्राफ्ट ऑर्डर अगर इतर प्रकारे ठेवी स्विकारणारी संस्था म्हणजे बँक होय. या शाखेच्या कार्यात सर्वच अंगाने व्याप्ती होणे आवश्यक आहे. या शाखेची सेवा फारच ढासळली आहे.तालुक्यातील सह.बँकासुध्दा ग्राहकाना दर्जेदार ,गतीमान सेवा देत असतात.
महादेव पाटील, चेअरमन आगरी ग्रामिण बिगरशेती पत संस्था. म्हसळा

Post a Comment