विकास कामांत मतांची बेरीज करत नाही : आदिती तटकरे
वावेपंचतन ते श्रीवर्धन - दिघी मुख्य रस्ता मार्गाचे भूमिपूजन
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामे करत असताना मतदारांची बेरीज न करता
विकास कामे करत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा कुमारी आदिती सुनिल तटकरे
यांनी बुधवार, दि. 18 रोजी वावेपंचतन येथे सांगितले.
दिघी - श्रीवर्धन मार्गावरील वावेपंचतन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामपंचायत आपली असेल तर विकासकामे झपाट्याने होतात. या रस्त्यासाठी दहा लाख पन्नास हजार रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. वावेपंचतन गावातील कै.रा.पा.दिवेकर व तटकरें साहेब यांचे जवळीक संबंध होते. तर तटकरें साहेब आपल्याला लाभलेले अत्यंत प्रभावी नेतृत्व व त्यांच्या नेत्रुत्वाखाली आम्ही कामे करत आहोत.अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, या रस्ताच्या उद्घाटन करायला येईल तेव्हा त्या स्मशानाकडे जाणार रस्ता अर्धा अवस्थेत आहे तो सुद्धा तटकरे साहेबांशी चर्चा करून भूमिपूजन करून पूर्णत्वाकडे करण्याचा वचन उपस्थित ग्रामस्थांना दिले. विकास कामे सुरवात झाली असुन ग्रामस्थांनी येणारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन एक हाती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता स्थापन कराल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. सुनील तटकरे यांनी वावेपंचतन रस्ता पूर्ण करण्याचे वचन दिले होते. आणि तो पूर्ण केला आहे.
यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला व्यासपिठावर तालुका अध्यक्ष दर्शन विचारें,युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे,रा.पा.दिवेकर हायस्कुलचे चेअरमन प्रदीप पवार,प.स.सदस्य मंगेश कोंबनाक,उप तालुका प्रमुख अमित खोत,दांडगुरी गावचे अध्यक्ष अशोक सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment