युवा संघटना म्हसळा तालुका यांचे कार्य कौतुकास्पद - युवा अध्यक्ष - श्री माधव कांबळे


युवा संघटना म्हसळा तालुका यांचे कार्य कौतुकास्पद -   युवा अध्यक्ष - श्री माधव कांबळे         
                               
म्हसळा    २१ एप्रिल २०१८  रोजी सायंकाळी ६ वाजता कुणबी राज्य संघटना( मुंबई) कोकण द्वारा  निमित्त म्हसळा येथे युवक संघटना यांची भेट घेऊन आपल्या संघटनेची पुढील ध्येय आणि उद्दिष्टां बाबत मार्गदर्शन केले  यावेळी या द्वारा धरम्यान उपस्थित कुणबी राज्य युवा अध्यक्ष श्री  माधवजी कांबळे साहेब, युवा सेक्रेटरी गावडे  साहेब, युवा उपाध्यक्ष रायगड जिल्हा अजय जाडे, युवा रत्नागिरी अध्यक्ष सूर्यकांत  गोताड, युवा ठाणे अध्यक्ष प्रमोद जाधव,  युवा प्रचारक प्रसन्न कोलथे,  संगमेश्वर  संघटना प्रचारक विष्णू खापरे, युवा दापोली प्रतिनिधी  सागर मांजरेकर,  युवा अध्यक्ष तळा  दिपक शिगवण,  म्हसळा तालुका युवक संघटना अध्यक्ष श्री संतोषजी पाखड साहेब, सचिव सतीश शिगवण,  उपाध्यक्ष श्री संदिप चाचले साहेब, जयसिंग बेटकर,  महेशजी पवार,  गजानन पाखड,  अभय तिलटकर,  सल्लागार केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.        उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले  यावेळी  युवा अध्यक्ष श्री माधवजी कांबळे यांनी  आपल्या कुणबी समाजाची चळवळ या महाराष्ट्रात आणि कोकणात  कशी प्रकारचे ध्येय आणि उद्दिष्टे असायला पाहिजे याची पाश्र्वभूमी सांगितली.  आपल्या समाज्याच्या बांधवाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे,  अन्यायकारक गोष्टींवर न्याय मिळवता आला पाहिजे अश्या मुद्द्यावर माहिती विषद केली.  तसेच संघटनेचे सेक्रेटरी श्री गावडे साहेब यांनी चतुरसुत्री कार्यक्रमाचा आराखडा समजून सांगितले १. जातीनिहाय जनगणना कुणबी सामाजाची झाली पाहिजे आणि  ओबीसी प्रवर्गाला सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे २. पदवीधर मतदार संघात आपल्या कुणब्यांच्या पदवीधर बांधवांनी मतदार नोंदणी करून आघाडी घेतली पाहिजे. ३. कुळ कायदा  याचा लाभ आपल्या बांधवाना मिळाला पाहिजे ४. मुलुंडच्या वसतीगृहा बाबत जनजागृती व सविस्तरपणे माहिती देण्यात आली.    यावेळी  सर्व मुद्द्यावर चर्चा करून  म्हसळा तालुका कुणबी युवक अध्यक्ष श्री संतोषजी पाखड यांनी सांगितले की या सर्व विषयाची माहिती आमच्या म्हसळा तालुक्यातील चार विभागात पोहोचवून नक्कीच युवकांमध्ये समाज जनजागृती करण्याचे हमी  राज्य संघटनेला दिले  यावेळी म्हसळा तालुका सेक्रेटरी श्री सतिश शिगवण यांनी  म्हसळा तालुक्यातील कुणबी युवां बाबत प्रश्न विचारून  राज्य संघटने सोबत सकारात्मक चांगली चर्चा घडवून आणली.    उपस्थित कांबळे साहेब आणि सोबत आलेले कुणबी संघटना प्रतिनिधी याना म्हसळा युवक संघटनेचे कार्य उत्तमरीत्या आहे याचे कौतुक केले.  या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जयसिंग बेटकर सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री.  सेक्रेटरी श्री सतिश शिगवण यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा