भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाणेरी कोंड शाळेत घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या  जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी रॅली काढण्यात आली,  आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.  वर्गशिक्षक बेटकर सर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पट सांगितले आणि त्यांचे कार्यावर प्रकाश टाकला . यावेळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाणेरी कोंड चे विद्यार्थी आणि अंगणवाडी केंद्र घाणेरी कोंड चे सहभागी झाले होते.  यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्वेता वणे, उपाध्यक्षा अंजली येले,  सदस्या  हर्षला येले,  सुमित्रा वणे,  विनिता पागडे,  विकिता वणे,  प्रिया वणे,  अंगणवाडी सेविका जया बेटकर,  मदतनिस जुवेता खेडेकर,  शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग बेटकर उपस्थित राहुन महामानवाला अभिवादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा