म्हसळा तालुक्यातील सर्वातमोठ्या ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप:स्वदेश फाउंडेशनला कोणतीही निविदा न काढता दिलेला तीन लाख रुपयांचा चेक वादाच्या भोवऱ्यात: स्थानिकांची कारवाई करण्याची मागणी
म्हसळा(प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यात सार्वत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी स्थानिकांना जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारयांकडे लेखी तक्रार केली आहे.तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे.स्वदेश फाउंडेशन या खासगी संस्थेने २०१६/१७ या आर्थिक वर्षामध्ये शेतीसाठी पाणीपुरवठा करिता ग्रामपंचायत हद्दीतील ३६ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी सहा हजार प्रमाणे रक्कम जमा केली होती.मात्र ही रक्कम जमा करून देखील शेतीसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांच्या जागेमध्ये पाणी मात्र आले नाही.असे असताना देखील खरसई ग्रामपंचायतीच्या नव सरपंच आणि ग्रामसेवकांनी याच योजनेसाठी विनानिविदा स्वदेश फाउंडेशन या खासगी संस्थेला पुन्हा ३ लाख रुपये अदा केल्याचा आरोप स्थानिक नझीर आमीर जहांगीर यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केला आहे.याबाबत सखोलपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.सदर तक्रार पत्रामध्ये खरसई ग्रामपंचायतीने कोणतीही ई-निविदा न काढता स्वदेश फाउंडेशन या खासगी संस्थेला धनादेश क्र.१९१५२ नुसार ३ लाख रुपये तर धनादेश क्र.१९१५१ नुसार २० हजर रुपये अदा केले आहेत.यापैकी धनादेश क्र.१९१५२ हा शेतीसाठी पाणीपुरवठा करिता देण्यात आला असून संबंधित कामाची तरतूद १४वा वित्त आयोग विकास आराखडा व मुख्यमंत्री सामाजिक ग्रामपरिवर्तन मिशन गाव विकास आराखड्यामध्ये केलेली नाही.या व्यतिरिक्त विकास आराखड्यात कोणतेही बदल करताना जिल्हापरिषदेच्या मुखाधिकारी यांची परवानगी घेतील नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.शासन निर्णय क्र.निविदा २०१४-प्र.क्र.२६०/पं रा -७ या संकेतांक क्र २०१५०५२७१७४२४३६७२० दि.२७ मी २०१५ अन्वये ग्रामपंचायत स्तरावरील ३ लाख व त्यापेक्षा अधिक किमतींच्या विकासकामांना ई निविदा प्रणाली लागू करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.असे असताना देखील खरसई ग्रामपंचायतीमधील सरपंच तथा ग्रामसेवकांनी शासनाच्या या निर्णयाचा भंग केला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
चौकट- खरसई ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या विकास कामांना आपला विरोध नसून,शेतामध्ये पिक येण्यासाठी जीवाचे राण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्ट्राचार होत असल्यास त्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्याशिवाय गप्प बसणार नाही-निलेश मांदाडकर,माजी सरपंच खरसई ग्रामपंचायत
स्वदेश फाउंडेशन ही संस्था पंचायत राज विषयक अनेक प्रशिक्षण राबवून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देत असते असले तरी खरसई ग्रामपंचायतीचा चेक स्वीकारताना सोयीस्करपणे संस्थेला नेमका नियमांचा विसर पडला कसा ? किंवा या नियमांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले असावे---सुज्ञ नागरिक

Post a Comment