सेवानिवृत्त संघटनेचा म्हसळयामध्ये मेळावा संपन्न

सेवानिवृत्त संघटनेचा म्हसळयामध्ये मेळावा संपन्न
म्हसळा(प्रतिनिधी)
तालुक्यातील शासकीय सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मेळावा शहरातील कन्याशाळेमध्ये दिनांक १७ एप्रिल रोजी संपन्न झाला.या मेळाव्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि कार्माच्यानी संघटनात्पर भाषण केले.व संघटना कशी टिकवता येईल या बाबत माहिती दिली.कार्याकार्मामध्ये ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शशिकांत नाशिकर,चव्हाण गुरुजी व विलास मधुकर यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी म्हसळा पंचायत समितीचे सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा कविता बोरकर,बांधकाम सभापती दिलीप कांबळे,पोलीस प्रतिनिधी श्यामराव खराडे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी,उपाध्यक्ष श.ना.गायकवाड,कोषाध्यक्ष जाधव,सरचिटणीस प्र.गो.पाटील,तळा येथील शिर्के गुरुजी,वेदक गुरुजी,श्रीवर्धन चे चीलवान आदी मान्यवर उपस्थिती होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी म्हसळा अध्यक्ष प्रदीप सुतार,सरचिटणीस दिलीप महादेव शिर्के,प्रवीण करडे,अनंत येलवे,सुनील उमरोटकर,रामजी भायदे,कराडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा