सालविंडे गावचे सुपुत्र श्री.अनिल नारायण काप यांची म्हसळा तालुका शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी निवड..
प्रतिनिधी,
शिवसेनेचे केंद्रीय अवजड उधोग मंत्री श्री.अनंत गीते साहेब यांच्या आशिर्वादाने, जिल्हाप्रमुख श्री.रवी मुंडे यांच्या, आदेशानुसार श्रीवर्धन मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख रवींद्र लाड साहेब,तालुकाप्रमुख नंदूजी शिर्के, संपर्कप्रमुख श्री गजानन शिंदे, तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक यांच्या प्रयत्नाने साळविंडे गावचे सुपुत्र बाळासाहेब यांचे कट्टर भक्त श्री.अनिल नारायण काप यांची ता.म्हसळे जि. रायगड
सहसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.अनिल काप यांच्या निवडीने तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि युवासैनिक यांच्या आनंदाचे वातावरण आहे .अनिल काप यांची निवड तालुक्यातील शिवसेना पक्षासाठी मोलाची ठरणार आहे कारण काप यांची सर्व जाती धर्माच्या लोकांशी असलेले स्नेहाचे संबंध फायदेशीर ठरणार आहेत

Post a Comment