शासकीय कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात म्हसळा वन विभागाचे स्थान अव्वल दर्जाचे : प्रविण पवार
पंतप्रधान उज्वला गॅस योजनेत १२० लाभार्थीना केले गॅस वाटप
म्हसळा : निकेश कोकचा
वृक्ष लागवड, पाणी आडवा - पाणी जिरवा, अशा विविध कार्यक्रमा सोबत पंतप्रधान उज्वला गॅस योजना परिपूर्ण राबविण्यात म्हसळा वन विभागाचे स्थान अव्वल दर्जाचे असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यानी व्यक्त केले. पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या १२० लाभार्थीना म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे हॉलमध्ये झालेल्या या वाटपाच्या कार्यक्रमाला परिक्षेत्र वन अधिकारी व्ही.एम .पोवळेे, ग.वी.अ. वाय.एन. प्रभे, तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी, एच.पी. गॅसचे सेेल्स ऑफीसर भानू मोहन, वाचनालयाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, एच.पी. गॅस कंपनीचे वितरक सईद अहमद कादरी, परीमंडळ वन अधिकारी बाळकृष्ण दादा गोरनाक, संजय चव्हाण, सुधिर म्हात्रे, विजय पवार, चंद्रकांत मगर, एस .पी.थळे, आर.एस्.थळकर, वनरक्षक, संयुक्त वन व्यवस्थापन समतीचे अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते .
म्हसळा वन विभागा अंर्तगत ३८ वन व्यवस्थापन समीत्या असून मागील ५ वर्षाचे कालावधीत ३६६ लाभार्थाना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यासाठी सुमारे २५ लक्ष५ हजार ५२० निधी अनुदान वापरले. तालुक्यात पंतप्रधान उज्वला योजने अंर्तगत विविध उपक्रम राबऊन तालुक्याचा वन विभाग धूर मुक्त स्वयंपाघर कार्यक्रम यशस्वी राबवित आहे .ग्रामस्थानी वन विभागाअंर्तगत विविध कार्यक्रम यशस्वी पणे राबविण्यासाठी वन विभागाला सकारात्मक साथ देणे गरजेचे आसल्याचे पवार यानी सांगितले.परिक्षेत्र वन अधिकारी व्ही.एन. पोवळे. गटविकास अधिकारी प्रभे ,पत्रकार खांबेटे व गॅस कंपनीचे अनिल जंगम यानी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment