दिवेआगर समुद्रकिनारी रंगले नौकानयन : रायगड मधील पहिल्याच उपक्रमात अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील समुद्रकिनारी नौकानयन व जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या.रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळी पर्यटन वाढीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने सागरतट व्यवस्थापन समिती तर्फे तालुकास्तरीय नौकानयन व जलतरण स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच उदय बापट, ग्रामविकास अधिकारी रविंद्र काळे, सहा. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा अठरा वर्षाखालील व अठरा वर्षानंतर अशा दोन गटात घेण्यात आल्या. जलतरण स्पर्धेत कृष्णा वाघे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना रोख तीन हजार व ट्रॉफी देण्यात आली. दुसरा क्रमांक सेहब शेखदरे यांनी पटकावले असून त्यांना रोख दोन हजार व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांक साकीब शेख याने मिळवला असून त्याला राख एक हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. नौकानयन स्पर्धेत देखील अटीतटीच्या च्या स्वरूपात झाली. यात प्रथम क्रमांक भारत खोपटकर यांनी पटकावला त्यांना रोख पाच हजार व ट्रॉफी असे बक्षीस मिळाले. द्वितीय क्रमांक योगेश चोगले यांनी मिळवले असून त्यांना रोख तीन हजार व ट्रॉफी देण्यात आली तर तृतीय क्रमांक कृष्ण चोगले यांनी मिळवलं असुन त्यांना रोख दोन हजार व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मेरिटाईम बोर्ड व दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे अनेक अभिनय उपक्रम दिवेआगर समुद्रकिनारी राबविले जात असून भविष्यात येथे पर्यटनाची नवनवीन दालने उभी राहतील असे दिवेआगर येथे स्पर्धेच्या वेळी उपस्थित पर्यटकांनी सांगितले.या वेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे दिवेआगर समुद्र किनारा डव्हलपर्स,उप सरपंच गीता वाणी,(गणपती ट्रस्ट अध्यक्ष महेश पिळणकर) ग्रा.प.सदस्य सुहास मार्कंड,सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र नार्वेकर,व दिवेआगर व रायगड जिल्ह्यांतील नागरी या स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नौकानयन स्पर्धे मुळे तसेच जलतरण स्पर्धेमुळे पर्यटन वाढीसाठी आणखी चालना मिळणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे मत दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी व्यक्त केले.
दिवेआगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटक वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असुन यामुळेच या ठिकाणी पर्यटक वाढीला चालना मिळत आहे.असे मत ग्रामविकास अधिकारी रवींद्र काळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment