मराठी कन्याशाळा लोकसहभागातून झाली डिजीटल...
बोर्ली पिंचतन :
शाळांच्या वैविध्यपूर्ण उपक्रमास पंचायत समिती पूर्णतः शाळांच्या पाठीशी असून आपण सर्व शाळेच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन श्रीवर्धन पंचायत समिती सदस्या व गटनेत्या मीना गाणेकर यांनी केले . लोकसहभागातून डिजीटल झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन मराठी कन्याशाळेच्या डिजीटल उद्धाटनप्रसंगी त्या बोलत होत्या . पंचायत समिती सदस्या व गटनेत्या मिना गाणेकर यांच्या उपस्थितीमध्ये शाळा डिजीटलकरणासाठी मदत करणार्या मान्यवरांच्या हस्ते डिजीटल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले . संगणकीय युगामध्ये प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असावे तसेच आताच्या मुलांचा ओढा हा संगणक व तत्सम आयटी क्षेत्राकडे जास्त असल्याने विद्याभ्यांचे शिक्षण देताना जास्त मन ह्या प्रकाराकडे वेधले जाते . त्यामुळे संगणक ही एक काळाची गरज भासू लागल्याने आता प्राथमिक शाळांपासून म्हणजे पहिलीच्या वर्गापासूनच्या असणाच्या शाळा डिजीटल करण्याचा सर्व पालकांचा अधिकारीवर्गाचा ओढा आहे यातच श्रीवर्धन तालुक्यतील बोर्ली पंचतन रायगड जिल्हा परिषदेची कन्याशाळा आता लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली असून या शाळेच्या डिजीटल प्रणाली कक्षाचे उद्घाटन अखंड आगरी समाज बोलपंचतनचे उपाध्यक्ष ऋषिकांत गायकर तसेच संगणक प्रणालीचे उद्घाटन माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खोपकर व ग्रामस्थ राजेश तारकनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत तोडणकर हे होते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे , पंचायत समिती सदस्य तथा गटनेत्या मीना गाणेकर , माजी सभापती सुकुमार तोंडलेकर , गट समनव्यक शितल तोडणकर , केंद्रप्रमुख सूर्यकांत तोडणकर , ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तोडणकर , मॉडर्न इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक संतोष मुरकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थिनींनी विविध स्टॉल्स उभारले होते काहींनी आईच्या सहकार्यातून तयार केलेल्या खाद्यपदार्थाची स्पर्धा यावेळी भरवण्यात आली होती .

Post a Comment