डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही केंद्र सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने भीम अॅप वापरणाऱ्यांना आजपासून कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. भीम अॅपच्या माध्यमातून कॅशबॅकच्या अनेक योजनांचा फायदा ग्राहकांना होणार आहे. आर्थिक व्यवहारांसाठी इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, भारत सरकारद्वारे सुरू केलेला एक उपक्रम आहे. कॅशबॅक ऑफरमधून ग्राहकांना एका महिन्याला 750 रुपये आणि व्यावसायिकांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
भीम अॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. हे अॅप केवळ २ एमबी असल्यामुळे काही सेकंदात अॅप डाऊनलोड करता येते. हे अॅप वापरणाऱ्यांसाठी बॅंक खाते आपल्या मोबाईल नंबरने जोडलेले असणे आवश्यक आहे. या योजनेतून सुरूवातीला 100 रूपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारावर 51 रूपयांचं कॅशबॅक मिळणार. त्यानंतरच्या 20 युनिक ट्रॅन्झॅक्शनवर प्रत्येकी 25 रूपये कॅशबॅक मिलेल. त्यानंतर 25 ते 50 ट्रॅन्झॅक्शन्सवर फिक्स 100 रूपये कॅशबॅक तर 50 ते 100 ट्रॅन्झॅक्शन्सवर फिक्स 200 रूपये मिळतील. एकूण 10 ट्रॅन्झॅक्शन्सवर 200 रूपये मिळतील तर 100 पेक्षा जास्त ट्रॅन्झॅक्शन्सवर 250 रूपये वापरणाऱ्यांना मिळतील.

Post a Comment