म्हसळा एसटी अपघात : चालकाच्या चुकीमुळे प्रवासी सुनील गायकर याचे कुटुंब उध्वस्त


म्हसळा एसटी अपघात : चालकाच्या चुकीमुळे प्रवासी सुनील गायकर याचे कुटुंब उध्वस्त

म्हसळा - निकेश कोकचा 

महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून “प्रवाश्यांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य प्रवाश्यांच्या जीवावर बेतताना दिसत असून असाच एक प्रकार म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत शनिवार दिनांक २८ एप्रिल रोजी घडला.यावेळी दोन बसचे समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये सुनील गायकर वय ३५ वर्षे या तरुणाचा हात डॉक्टरांच्या सल्ल्यांनी कापण्यात आले तर त्याचा पाय हा निष्क्रिय झाला आहे.शासनाच्या एसटी बस अपघातामुळे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळ असणाऱ्या वांजळे ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या गायकर याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांच्या तीन चिमुकल्या मुलींची जबाबदारी शासन घेणार का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.उन्हाळाच्या सुट्टी मध्ये आज्ञा सुनील गायकर वय २ वर्षे,सारंगी सुनील गायकर वय ८ वर्षे,आर्या सुनील गायकर वय १० वर्षे या माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे आपल्या मावशीकडे गेल्या होत्या.बरेच दिवस मुली घरामध्ये न्हवत्या त्यांचा बघण्यासाठी व काहीतरी पित्याच्या मायेने खाऊ घेऊन जाऊ असे सुनील यांच्या मनामध्ये आल्यानंतर दुपारी २ च्या सुमारास थेट बोर्ली पंचातन येथे असणाऱ्या  एसटी बसचा थांबा गाठला.या बस थांब्याजवळ अनेक खासगी मिनीडोर चालू असता देखील स्वताच्या सुरक्षितेच्या दृस्ठीने सुनील याने बस बसची वाट पाहणे योग्य समजले.दुपारी ०२:३० मिनिटांनी श्रीवर्धन येथून सुटणारी बोर्ली मार्गे नालासोपारा एशियाड बस गाडी क्रमांक एमएच २० बीएल ३२९५ या गाडीमध्ये तो म्हसळया पर्यंत येण्यास बसला.मात्र ही गाडी खरसई ग्रामपंचायतीच्या हद्दीती येताच समोरून येणाऱ्या दुसऱ्या नालासोपारा बोर्ली श्रीवर्धन एसटी एशियाड गाडी क्रमांक एमएच १४ बीटी ४९०९  च्या बस चालकाचे वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट बस समोरील बस वर चढवून अपघात केला.या अपघातामध्ये चार प्रवासी गंभीरपणे जखमी झाले असून पाच किरकोळ जखमी झाले होते.गंभीरपणे जखमी मध्ये सुनील देखील होता.त्याच्या हाताला आणि पायाला मोठ्याप्रमाणात दुखापत झाली होती.प्रथम त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र या रुग्णालयात डॉक्टरांव्यतिरिक्त कोणतीही उपचार सामग्री नसल्याने त्याला मुंबई येथील के.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले.येथे त्याच्यावर अधिक उपचार करताना त्याच्या जीवाला दगाफटका होऊ नये म्हणून त्याचा हात कापण्यात आला आला असून त्याचा पाय कायमचा निष्क्रिय झाला आहे.सुनील याच्या कुटुंबात त्याचे वयस्कर आई वडील,दोन छोटे भाऊ,बायको व तीन चिमुकल्या मुली आहेत.कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही सुनीलच्या खांद्यावर असल्याने आज बस अपघातामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.शासनाच्या या बस चालकांच्या चुकीमुळे प्रवासी सुनीलचे याच्या उध्वस्तझालेल्या कुटुंबाची व त्याच्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलींची जबाबदारी शासन घेईल का? असा प्रश्न आता सामान्य प्रवाश्यांना पडला आहे.

खरसई येथे झालेल्या बस अपघातामध्ये सुनील गायकर याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालेले आहे.सुनील हा शासनाच्या एसटीने प्रवास करीत असताना त्याचा अपघात झाला असून त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी आता शासनाने उचलावी असे वांजळे ग्रामपंचायत ,उपसरपंच विलास दर्गे यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा