माणगाव दिघी रस्त्याच्या चौपदरीकरण धीम्या गतीने...

माणगाव दिघी रस्त्याच्या चौपदरीकरण धीम्या गतीने...

श्रीवर्धन : प्रतिनिधी
या वर्षाचा पावसाळा संपल्यानंतर लगेचच माणगाव ते दिघी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते . परंतु आता पावसाळया एक महिन्यावर येऊन ठेपला तरीही काम संथ गतीने सुरू आहे जे . एम . म्हात्रे इंफ्राप्रोजेक्टस प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीने सदर रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला आहे . या कंपनीने माणगाव म्हसळा मार्गावर स्वतःच्या मालकीची दगड खाण व काँक्रिट तयार करणारा रेडी मिक्स प्लॅट उभारला आहे . रस्त्याच्या दोन्हीही बाजूला रुंदीकरण करण्यासाठी खोदकाम झालेले आहे . परंतु त्यामध्ये भराव झालेला नाही . अजुन अनेक मोठ्यां कामासाठी खोदकाम सुरू झालेले पहावयास मिळत आहे . पुलांच्या सुंदीकरणाची कामे अद्याप प्रलंबित आहेत . रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या कंपनीने माणगाव ते दिघी या मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले , पण काही ठिकाणचे खड्डे भरलेच नाही . साई ते चांदोरे या मध्ये बच्याच ठिकाणी खड्डे आहेत . घोणसे घाटात सुद्धा रस्ता प्रचंड खराब आहे खरसइ ते मेंदडी दरम्यान अनेक मोठे खट्टे आहेत . तसेच मेंदडी ते गोंडघर फाटा या दरम्यान मोठमोठे खड्डे आहेत . वेळास ते दिघी या दरम्यान सुद्धा रस्ता खूप खराब आहे . रस्ता खराब होण्यामागचे मुळ कारण या मार्गावरुन रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन घेऊन होणारी अवजड वाहतूक आहे अनेक वेळा बहुदा सर्वच राजकीय पक्षानी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलने केली . पण आपली पोळी भाजुन झाल्यावर आंदोलन मागे घेतली . आपल्या कार्यकत्यांना वाहतुकीचे ठेके मिळवणे , दिघी पोर्ट मधीलभंगार काढण्याचा ठेका , अशा स्वार्थीपणा साठी हि आंदोलने करण्यात आली , यामध्ये जनतेचे कोणतेही हित नव्हते . स्वपक्षाच्या हितासाठीच हि आंदोलने झाली . पावसाळा एक महिन्यात सुरु होणार आहे , या मार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे तरी लागणार आहेत . तरी संबंधित ठेकेदाराने ज्याठिकाणी खड़े आहेत ते पावसाळ्यापुर्वी बुजवावे अशी मागणी वाहन चालक व नागरिक करित आहेत . सध्या सुट्ट्यांचा मोसम सुरु झाला आहे , पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत , मात्र खराब रस्त्यांबद्दल पर्यटकामध्ये नाराजी दिसत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा