जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने म्हसळ्यातीत आरोग्य कर्मचाऱ्यानी घेतली हिवतापास हरविण्याची शपथ
म्हसळा : निकेश कोकचा
जागतिक आरोग्य संस्थेमार्फत २ ५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने म्हसळा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया अंर्तगत म्हसळा, मेंदडी, खामगांव प्रा.आ. केंद्र , जि.प. दवाखाना पाभरे व ग्रामिण रुग्णालयांतील वैद्यकिय अधिकारी कर्मचारी यानी मलेरीया प्लास्मोडीयम अन्वेषक डॉ . रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिवतापास हरविण्याची एकत्रित शपथ घेतली . यावेळी ता .आ. अधिकारी डॉ. सूरज तडवी, डॉं गजानन भारती, डॉ . अरुण सानप, डॉ अविनाश राहीरे, डॉ अकांक्षा पॉल, डॉ.पवनकुमार यादव,डॉ. सुहास मोरे, डॉ . चंकी पराडके, डॉ. प्रशांत गायकवाड, सुभाष तेटगुरे,रायगड जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमोल खैरनार, एस. डी. म्हात्रे, महेश पाटील, अरुण कोल्हे,यु.डी. राऊत, विश्वास तांडेल, गणेश शिरसाठ, शैलेश लाखे, राहुल काप, श्रीकेश पाटील, श्रीमती ज्योती महाडीक, गीतांजली पाटील, रिना धनावडे, अमिता मोरे, मनिषा डोईफोडे, कल्पना गडरी, दिपिका वाणी, तारा बारगजे, प्रणाली कांबळे, शितल भगत व अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------
हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेण्याची आवश्यकता आहे.-----------------------------------------------------------------------------------
डॉ. अरूण सानप. वैद्यकिय अधिकारी, ग्रामिण रुग्णालय म्हसळा.
ग्रामपातळी पासून ते मोठ्या शहरापर्यंत सर्व स्तरावर किटकजन्य आजार व करावयाच्या सोप्या प्रतिबंधक उपाय योजनांची माहीती त्यामध्ये पाणी साठवण पद्धत , कोरडा दिवस पाळणे, जीव शास्त्रीय उपाय योजना इत्यादी सामान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे महत्वाचे आहे.
डॉ. अविनाश राहिरे, ग्रामिण रुग्णालय ,म्हसळा

Post a Comment