श्रीवर्धन प्रशासकीय इमारतच अस्वच्छ : स्वच्छकाचे पद रिक्त असल्याचा परिणाम
श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या प्रशाकीय इमारत अस्वच्छ झाली असल्याने कर्मचार्यांसह नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे . या प्रशासकीय इमारतीत उपविभागीय आधिकारी कार्यालय , तहसिल कार्यालय , मंडळ आधिकारी व तलाठी कार्यालय , दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यात आहेत . मात्र याठिकाणी स्वच्छता राखली जात नासल्याने नागरिकही नाराज आहेत . याबाबत विचारणा केली असता स्वच्छता कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्याचे श्रीवर्धन तहसील कार्यालयाची अत्यंत जुनी असलेली ब्रिटिश कालीन इमारत मोडकळीस आली होती . श्रीवर्धनला उपविभागीय अधिकारी कार्यालय आराठी परिसरात होते . मंडळ तलाठी व आधिकारी कार्यालय पावसाळ्यात पूर्णपणे गळत असल्यामुळे वापरण्यास योग्य नव्हते . तटकरे यांनी सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असल्यास नागरिकांना सोयीचे होईल हा दृष्टीकोण ठेवून मध्यवर्ती प्रशासकीय भवन ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला आराखडा तयार करुन प्रस्ताव तयार करण्यासाठी सुचना दिल्या . या इमारतीच्या बांधकामासाठी निधीची तरतुद करुन दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले . त्यानंतर इमारतीचे उद्घाटन करण्यात आले उपविभागीय आधिकारी ( प्रांत ) कार्यालय , तहसिल कार्यालय , मंडळ आधिकारी व तलाठी कार्यालय , दुय्यम निबंधक ( सबरजिस्टार ) कार्यालय सदर इमारतीमध्ये सुरु करण्यात आली . अत्यंत प्रशस्त जागेत ही इमारत बांधण्यात आली असुन प्रत्येक कार्यालयासाठी प्रशस्त व भरपुर उजेड असलेली दालने आहेत . मात्र एवढ्या मोठ्या इमारतीच्या स्वच्छतेचा प्रश्न कोणत्याही प्रशासकीय अधिकार्याच्या कसा लक्षात आला नाही हा मोठा प्रश्न आहे ईमारतीच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण फरशी अस्वच्छ असते . धुळीचा थर फरशीवर पहायला मिळतो . स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नाही . जीना चढताना सुद्धा जीन्याच्या लाद्या अस्वच्छ असल्याचे दिसून येते .
या बाबत श्रीवर्धनचे निवासी नायब तहसीलदार निगुडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की , या ठिकाणी स्वच्छक या पदावर असलेला होऊन कर्मचारी प्रमोशन रोहा येथे बदली झाल्याने हे पद रिक्त आहे . खाजगी मजूर घेऊन साफसफाई करावी लागते . परंतु खाजगी मजूर नियमित येत नाही . तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून श्रीवर्धन येथे रिक्त असलेले स्वच्छकाचे पद तातडीने भरण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे .

Post a Comment