बाणकोट खाडीत सक्शन पंपांचा हैदोस : हातपटीचा परवान्यावर पंपांचा वापर; महसूल व पोलीस यंत्रणेची डोळेझाक.
श्रीवर्धन - श्रीकांत शेलार
म्हसळा तालुक्यातील आंबेत व लगत असलेल्या म्हाप्रल येथे सावित्री नदी खाडीत मोठ्या प्रमाणात सक्शन पंपांचा वापर होतो. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या नियमबाह्य व अवैध रेती उपसा मुळे महसूल बुडत आहे. मात्र महसूल व पोलिस प्रशासन यांकडे डोळेझाक करीत आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदीपात्रात होणारे रेती उपसा साठी हातपाटी परवाना देण्यात येतो मात्र रेती उपसा सक्शन पंपाने होतो. बाणकोट खाडीत वेशवी, शिपोळे, उमरोली तसेच 30 ते 35 सक्शन पंपाने वाळू उत्खनन व विक्री होत आहे. म्हाप्रळ बंदर, लोकरवण, दापोली व आंजर्ले इत्यादी ठिकाणी वाळू उपसा, साठे पाहायला मिळतात व वाहतूक ही रायगड जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात होते. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध उत्खनन वर लक्ष दिले जात नाही व त्यामुळे महसूल बुडत आहे.
श्रीवर्धन रोजी श्रीवर्धन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम जगताप व म्हसळा तहसीलदार यांनी 30 जानेवारी रोजी आंबेत खाडी पट्ट्यात सक्शन पंपाने अवैध रेती उपसा करणाऱ्या वर धाड टाकली होती. त्यावेळी आठ लाखांची यंत्र सामग्री जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये श्रीवर्धन येथील आरोपी मोहतसिम जलिस करदमे व म्हाप्रळ येथील आरोपी नाहिद नियाज मांडलेकर यांना गोरेगाव पोलिसांनी अटक करून बुधवारी ता -11 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपी नाहीद मांडलेकर याने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांकडून हातपाटी परवाना घेतला असताना सक्शन पंपांचा वापर करत होता. अशा आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाया होणे अपेक्षित असताना साधा चोरीचा गुन्हा गोरेगाव पोलिसांनी दाखल केला आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रल येथे बेसुमार सक्शन पंपाने होणाऱ्या रेती उत्खनन मुळे आंबेत - म्हाप्रल पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हाप्रल परिसरात तीस ते पस्तीस सक्शन पंपांचा वापर उत्खनन साठी होत असताना पोलीस व महसूल अधिकारी का कारवाई करत नाही याबाबत उलट सुलट चारचा सुरू आहे. म्हाप्रल येथे उत्खनन केलेली वाळू महाड तालुक्यातील वराठी येथे साठवून चोराटी व चढ्या भावाने विक्री केली जाते मात्र महाड तहसीलदार यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
हातपाटी परवाना फक्त नावाला -
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीपात्रात होणारे रेती उपसा साठी हातपाटी परवाना देण्यात येतो मात्र रेती उपसा सक्शन पंपाने होतो. बाणकोट खाडीत मंडणगड तालुक्यातील वेशवी, शिपोळे, उमरोली व म्हाप्रल येथे 30 ते 35 सक्शन पंपाने तसेच दापोली तालुक्यात आंजर्ले येथे 12 ते 15 वाळू उत्खनन व विक्री होत आहे. या सर्व ठिकाणी रेती उपसा, साठे पाहायला मिळतात व वाळू वाहतूक ही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात होते.
एमपीडिए कायद्याने कारवाई व्हावी.
- वाळू माफियांना वेसण घालण्यासाठी महाराष्ट्र विघातक कारवाया विरोधी कायदा (एमपीडीए) वापरला जाणार असल्याचे सरकारने सांगितले मात्र पोलीस यंत्रणेने आद्यपही या कायद्यानुसार कारवाया केल्याचे निदर्शनास येत नाही. महसूल, गौण खनिज विभाग व पोलीस हे अवैध वाळू उपसा व अवैध वाळू साठा यांवर कारवाई च्या नावे कागदी घोडे नाचावण्यास नेहमी पुढे असतात मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य होत असल्याचे आरोप स्थानिक करत आहेत.

Post a Comment