श्रीवर्धन तालुक्यात तीव्र पाणीटंचाई : ही पायपीट थांबणार कधी...?
श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे मात्र सरकार दरबारी अद्याप हालचालीना वेग आलेला नाही . टँकर साठी चा प्रस्ताव एक आठवडा अगोदर सादर केला असून सुद्धा टँकर ची परिपूर्ती करण्यात पंचायत समितीच्या प्रशासन विभागास अपयश आले आहे असे निदर्शनास येते . तालुक्यातील साक्षी भेरी ( हरेश्वर , गुल येथील कासारकोंड , वडशेत वावे येथील आदिवासी वाडी , शेखाडी येथील मुळगाव शेखाडी येथे टैंकर पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे . श्रीवर्धन तालुक्यात रायगड रायगड जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्याची नोंद सदैव होते परंतु शासकीय उदासीनता व जनतेचे अज्ञान यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आलेल्या अपयशामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे तालुक्यातील जलसाठ्यात कम लीची घसरण झाल्याचे निदर्शनांस येते पाणी आडवा , पाणी जिरवा पाणलोट योजना , वनराई उपक्रम शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत वास्तविक पाहता जनतेस त्याचा काहीच उपयोग नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे तालुक्यातील विविध गावांनी पंचायत समितीकडे दिनांक २१ ला पाणी पुरवठा करण्या संदर्भात प्रस्ताव पाठवले आहेत तसेच रायगडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सदर प्रस्तावास दिनांक २४ एप्रिल रोजी तात्काळ मंजुरी दिली आहे तरी सुद्धा पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने संबधित गावांना पाणी पुरवठा केलेला नाही .

Post a Comment