अंतुलेंच्या गावात सोयीसुविधांची वानवा : आंबेतकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष....
* दवाखान्याची अवस्था पडक्या वाड्यासारखी
* एसटी स्थानक असुन नसल्यासारखे
* शाळांची अवस्था दयनीय
म्हसळा: अरुण जंगम
रायगड
व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर सावित्रीनदिच्या तीरावर
वसलेले आंबेत हे गाव. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी
केंद्रीयमंत्री बँ.ए.आर.अंतुले यांचे जन्म गाव अशी या गावाची स्वतंत्र ओळख
आहे.
बँ.ए.आर.अंतुले
यांनी त्याच्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या जन्म गावी म्हणजेच आंबेत
याठिकाणी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या मात्र त्यांच्या निधनानंतर
ह्या गावाला स्थानिक प्रतिनिधिंसोबत प्रशासनालाही विसर पडल्याने या गावची
अवस्था सध्या दयनिय झाली आहे. परंतु प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ह्या सोयीसुविधा असुनही नसल्यासारखेच आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे आंबेत गाव हे म्हसळा तालुक्यात असले तरीही तालुक्याच्या ठिकाणा पासुन 25 के 30 किमीच्या अंतरावर आहे
एकेकाळी जेंव्हा दोन गावांमध्ये एकमेकांशी दुवा नव्हता व गावांमध्ये
जाण्यायेण्यासाठी व्यवस्थित रस्ते नव्हते लोकांना दुस-या गावात जाण्यासाठी
बैलगाड़ी किंवा नदीपलीजाण्यासाठीहोडीचा वापर करावा लागायचा अशा वेळेस
मोठ्या प्रमुख गावांकडे जाण्यास महत्वाचे म्हणजे गोवा महामार्ग लोकानी ऐकला
होता पण कधीही पाहीला नव्हता त्यावेळेला मातीचे का होईना पण रस्त्यांची
उभारणी केली ती बँ.अंतुले यांनीच. लोकांकडे
उपचारासाठी कोणतेही साधन नव्हते कोठेही लवकरात लवकर जायचे असल्यास
जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध
नव्हत्या त्यावेळेस येथील ग्रामस्थांसाठी अंतुले
यांनी 1978मध्ये कुटुंब कल्याण केंद्राची स्थापना केली या कुटुंब कल्याण
केंद्राची आस्थापना पुढील प्रमाणे होती
1)आरोग्य अधिकारी
2)औषध निर्माण अधिकारी
3)आरोग्य सेविका
4)शिपाई, ही पदे कार्यरत होती.
ही
सर्व पदे केंद्र शासनाच्या 2211ह्या योजनेतुन भरणेत आली होती.मात्र काही
कालावधीनंतर केंद्रशासनाच्या आदेशानुसार ही योजना बंद झाली व त्यामुळे 2005
साली वरील सर्व पदे आरोग्यसेवेत इतरत्र समाविष्ठ करण्यात आली व 2005 मध्ये
सदर कुटुंब कल्याण केंद्र बंद पडले परंतु नागरिकांच्या सेवेसाठी
2005मध्येच उपकेंद्र आंबेतची स्थापना करण्यात आली व 2008 मध्ये
प्रसुतीगृहाची स्थापना करण्यात आली व येथील लोकांना आरोग्य सुविधा देण्यास
सुरवात करण्यात आली परंतु मागिल काही महीन्यांपासुन सदरचे उपकेंद्र बंद
अवस्थेत पडले आहे कारण येथे नेमलेली व्यक्तीच कामावर येत नसल्याची तक्रार
येथील ग्रामसस्थ कीर असताना देखील आरोग्य प्रशासन याकडे पुर्णपणे दुर्लक्ष
करीत आहे
सदरचे आंबेत येथील उपकेंद्र खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असुन यांना त्या केंद्रामध्ये सुविधा देण्याचे आहेत.सदर आंबेत येथील उपकेंद्र बंद असल्याने नाईलाजास्तव येथील लोकांना उपचार करण्यासाठी आंबेत पासुन 30किमी अंतरावर माणगाव किंवा महाड येथे जावे लागत आहे.
आज
या कुटुंब कल्याण केंद्राची अवस्था पडक्या वाड्यासारखी झाली असुन येथे
संपूर्ण जागेवर झाडीझुड़पाचे साम्राज्य पसरले आहे. व संपुर्ण प्रशिक्षण व
भेट केंद्र,कर्मचारी निवासस्थान,व रुग्णालयाचीईमारत यांची शासनाच्या
उदासीनतेमुळे लाखो रुपयांच्या ईमारती मोडकळीस आल्या आहेत
आपल्या गावातील व वाड्यांमधील मुले शिक्षणापासुन वंचित राहु नयेत याकरिता येथे शाळांची देखील सुविधा उपलबध केली 1960
ते 1970 च्या दरम्यान आंबेत उर्दु व मराठी शाळा यांचे बांधकाम करण्यात
आले. जवळपास 50होत असलेल्या या शाळांची अवस्था आजचेमितीस फार दयनीय झाली आहे
त्यातील आंबेतकोंड येथील शाळाची एक एमारत ज्यामध्ये तीन वर्गखोल्या होत्या
ती ईमारत 2016च्या जुलै महीन्यात अतीवृष्टी मध्ये कोसळली परंतु शासनाच्या
उदासीनतेमुळे ही ईमारतीचे काम एक वर्षानंतर देखील झाले नाही तर दुसरी
शाळेचे छप्पर जाने 18मध्ये रात्रीच्या वेळेस कोसळले या शाळेमध्ये 50
विद्यार्थी शिक्षण घेत असुन रात्रीची वेळ असल्याने फार मोठी हानी टळली .
यासर्व
गोष्टीकडे शिक्षणविभागाचे दुर्लक्ष असल्यानेच सगर गोष्टी घडत असल्याची बाब
समोर येत आहे कारण जवळपास पन्नास वर्ष झालेल्या या शाळांचे स्ट्रक्चरल
अॉडीट देखील शिक्षणविभागाकडुन करण्यात आलेले नाही
हेच
स्ट्रक्चरस आँडीट वेळेवर झाले असते तर ईमारतीचे छप्पर कोसळलेच नसते वेळीच
उपाय योजना करता आल्या असत्या असे येथील सुजाण व्यक्ती सांगत आहेत जी शाळा कोसळली त्या शाळेच्या बांधणीसाठी दीड लाखांचा निधी मंजुर करण्यात आला तोही एक वर्षानंतर.....
अतीदुर्गम व डोंगगराळ भागात वसलेल्या आंबेत या गावचे बसस्थानक
पाहताच कोणता तरी हेतु ठेवुनच सदर बस स्थानक बांधले असावे ह्याची कल्पना
येईल. म्हसळ्यातालुक्यात असलेले परंतु तालुक्याच्या
ठिकाणापासुन कोसो दुर डोंगरात वसलेले गावातील बसस्थानक म्हसळा हा जरी
तालुका ठिकाण असलेतरी येथेही इतके मोठे बसस्थानक नाही त्याहुनही मोठे व
विस्तीर्ण जागेमध्ये हे बसस्थानक आहे. सुमारे सहा एकर जमिन या बसस्थानकासाठी
घेतली असल्याचे समजते 6 मार्च 1987 साली बांधण्यात
आलेल्या या बस स्थानकाची ईमारतीचे उद्धाटन तत्कालीन परिवहन मंत्री विलासराव
देशमुख याचे हस्ते झाले अवध्या तीस वर्षातच या ईमारतीची दयनीय अवस्था झाली
आहे
दररोज 120 बस फे-या या (येणा-या व जाणा-या) या बस स्थानकातुन होत असताना देखील प्रवाशाॉना येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील देण्याचे काम महामंडळ प्रशासनाने केले नाही याबस स्थानकामध्ये कँटीनसाठी जागा,चालक वाहक याना विश्रांतीसाठी विश्रांतीगृह असतानादेखील प्रशासनाकडुन या बस स्थानकाकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे पाहताच दिसते.
या बसस्थानकाची ईमारत जिर्ण झाली असुन सळ्या व लोखंडी रॉड सँबमधुन बाहेर पडलेले स्पष्ट दिसत आहेत.
"आंबेत
विभागातील गोरगरीब जनतेवर शासनाच्या अक्षमतेमुळे खुप मोठा अन्याय होत आहे
कारण येथील दवाखाना बंद झाल्यापासुन खाजगी दवाखाऩ्यांचे पेव फुटले आहे व
बेफाट फी आकारुन गोरगरीब जनतेची फसवणुक करीत आहेत प्रशासनाने याकडे लक्ष
घालुन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र केल्यास आंबेतच्या जवळपासच्या 20गावे
तसेच 25 के 30वाड्यांना आरोग्य सेवा मिळेल"
नविद अंतुले, ग्रामस्थ आंबेत
"येथील
शासकिय जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे जेणे करुनदरामध्येयेथील गरीब
जनतेस योग्य दरामध्ये उपचार मिळु शकेल.शासनाने आंबेत विभागावर मोठा अन्याय
केला असुन येथे कोणीही डॉक्टर अथवा कर्मचारीयेत नसल्याने येथील नागरीकांना विशेष करुन स्रीयांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे.
सरपंच, आंबेत ग्रामपंचायत
"बँ.अंतुले
यांचे शब्दाखातर आमचे कुटुंबीयांनी आरोग्यसेवेसाठी जागा उपलब्ध करुन दिली
काही वर्ष केंद्राने हे उपकेंद्र चालविले मात्र गेली 15वर्ष आंबेत विभागावर
शासनाचा अन्याय होत आहे तरी शासनाने आंम्ही शासनास दिलेल्या जागेचा गरीब जनतेच्या हीतासाठी वापर व्हावा हीच आमची बँ.अंतुले साहेबांना खरी श्रद्धांजली असेल.
फारुक उभारे माजी सरपंच, आंबेत ग्रामपंचायत
"आंबेत
येथील बसस्थानकाच्या दुरावसथेबाबत विभागिय कार्यालय पेण यांचेकडे
पत्रव्यवहार केला असुन तेथील असणारे सर्व प्रश्न नक्कीच सोडविण्यात येतील
याची आंम्हाला खात्री आहे"
देवधर, आगारव्यवस्थापक,महाड आगार
------------------------------ --------------------------
"संबंधित कर्मचारी जे सुविधा देण्यात कसुर करीत आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश देणेत येतील.व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
डॉ.तडवी, तालुका आरोग्य अधिकारी




Post a Comment