श्रीवर्धन मधील जावेळे येथील स्वयंभू शिवमंदिर...


श्रीवर्धन मधील जावेळे येथील स्वयंभू शिवमंदिर...

श्रीवर्धन शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हरीहरेश्वर रस्त्यावर गालसुरे पासुन 3 किमी आतमध्ये जावेळे येथील शिवमंदिर. हे देवस्थान स्वयंभू आहे. रुद्राभिषेक करण्यास उत्तम ठिकाण. मंदीर परीसरात पुर्वी अनेक शिक्षण संस्थेचे कँप होत असत, अनेक वर्षा सहली याच मंदिर परिसराच्या सानिध्यात झाल्या. काही जणांना नक्की आठवत असतील त्या आठवणी. पावसाळ्यात येथील दृश्य नयनरम्य असतो. पावसाळ्यात येथील ओढा झुळझुळ वाहत असतो.  जावळे येथील हे स्वयंभू शिवमंदिर धार्मिक स्थळ असले तरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही येथे पाहायला मिळते. पावसाळी पर्यटन याठिकाणी वाढत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराला एकदा  नक्की भेट द्या.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा