स्मार्ट दिवेआगरमुळे पर्यटजाला उभारी : दिवेआगर ठरतेय पसंतीचे ठिकाण , रोजगार वाढीला संधी

स्मार्ट दिवेआगरमुळे पर्यटजाला उभारी : दिवेआगर ठरतेय पसंतीचे ठिकाण , रोजगार वाढीला संधी 

बोर्लीपंचतन : प्रतिनिधी
दिवेआगर . . . . नुसते नाव जरी उच्चारले की डोळ्यासमोर दिसतो तो विस्तीर्ण समुद्रकिनारा , पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू , कोवळे उन , नारळ सुपारीच्या बागा . रायगड जिल्ह्यातील सुवर्ण श्रीगणेशाने पावन झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये , यासाठी आता नवनव्या सुविधा निर्माण केल्या आहेत . त्यामुळे पर्यटकांना आल्हाददायक असे निसर्गसौंदर्य पहायला मिळते आहे दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सागरतट निधी , जिल्हा परीषद निधी तसेच १४ वा वित्त आयोगातील निधीतून बांधण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले . प्राप्त निधीमधून तळाणी व हनुमान पाखाडी किनाच्या जवळ खुल्या व्यायाम शाळांचे उद्धघाटन करण्यात आले . ज्या भागात पर्यटकांची जास्त प्रमाणात वर्दळ असते  अशा रूपनारायण , हनुमान पाखाडी व तळाणी विभाग येथील समुद्रकिनारी एकूण १० शौचालये व ३ चेंजिंग रूम्स तसेच जिल्हा परीषदेच्या ग्रामीण पर्यटन निधीतून ४ शौचालये , ४ चेंजिंग रूम्स , ४ मुताऱ्या बांधण्यात आल्या आहे . दिवेआगर गावात एकूण तीन ठिकाणी एकूण १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले , दोन ठिकाणी धोक्याचा इशारा किंवा अन्य इशारा देण्यासाठी सायरन , मोबाईल चाजिंग सेंटर , १० कचरा कुंडी , समुद्रकिनारी आरामदायी खुर्च्या, अपंगांसाठी ४ व्हील चेअर्स , समुद्रकिनारी रस्त्याला पथदिवे , उंटांवर बसण्यासाठी स्टैंड , पार्किंग व्यवस्था केली आहे . निसर्गरम्य अशा दिवेआगर परिसरात १०८ विविध प्रकारचे पक्षी नजरेस पडतात . दिवेआगर हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असल्यामुळे येथे विस्तृत सागर किनारपट्टी असून विशेष लोकप्रिय आहे . सध्या एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये मुंबई , पुणे , ठाणे , अशा शहरातून उष्मा अधिक प्रमाणात जाणवतो . अशा मोठ्या शहरांपासून दिवेआगर पर्यटन ठिकाण जवळ असल्याने पर्यटकांचा ओघ हा बराच वाढल्याचे दिसून येत आहे . 

सर्वसामान्य अपेक्षा पूर्णत्वाच्या मार्गावर . पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी दिवेआगर या पर्यटन ठिकाणी मुलभूत सोयी स्थानिक प्रशासनाने  पुरवल्या आहेत . इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत . घोडा आणि उंट सवारीमुळे बच्चेकंपनी , तर पॅरासेलिंगसारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडी मंडळीही खूश आहे . समुद्र किनारे स्वच्छ दिसत असल्याने पर्यटकांना समुद्रस्नान करण्याचा मोह आवरता येत नाही . समुद्रस्नान केल्यावर महिलांना कपडे बदलण्यासाठी किनायावर सोय झाली आहे अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने या किनार्यांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत . त्यामुळे हॉटेल व्यवासायही तेजीत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा